नांदेड; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेल्या ढाल-तलवार चिन्हावर सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजितसिंग कामठेकर यांनी आक्षेप नोंदविला आहे. ढाल तलावार हे खालसा पंथाचे धार्मिक प्रतीक आहे. शिखांच्या पाच तख्तांच्या ठिकाणी दररोज त्याची पूजा केली जाते. त्यामुळे हे निवडणूक चिन्ह म्हणून राजकिय पक्षांना देऊ नये, अशा मागणीचे पत्र कामठेकर यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.
निवडणूक आयोगाने त्रिशूळ हे चिन्ह धार्मिक असल्याचे कारण देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नाकारले. ढाल तलवार हेही चिन्ह धार्मिक आहे. ढाल-तलवार खालसा पंथाचे धार्मिक प्रतीक आहे. श्री गुरु गोविंद सिंघजी महाराज यांनी खालसा पंथाची स्थापना करताना ढाल-तलवार दिली. शिखांच्या पाच तख्तांच्या ठिकाणी दररोज ढाल-तलवारीची पूजा केली जाते. त्यामुळे ढाल-तलवार हे चिन्ह कोणत्याही राजकीय पक्षाला देऊ नये, अशी मागणी कामठेकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
हेही वाचा :