Latest

NSE co-location case : देशभरातील १० ठिकाणांवर सीबीआयच्या धाडी !

अविनाश सुतार

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : नॅशनल स्टाक एक्सचेंज (एनएसई) को-लोकेशन  (NSE co-location case) प्रकरणात सीबीआयने मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाअंतर्गत शनिवारी अनेक ठिकाणी धाडी घातल्या.

राजधानी दिल्ली, एनसीआरमधील नोएडा, गुरूग्रामसह मुंबई, कोलकाता तसेच गांधीनगरमधील १० हून अधिक ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही दलालांच्या ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(NSE co-location case) सीबीआयने या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच एनएसईचे माजी व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि समूह संचालक अधिकारी आनंद सुब्रमण्यम यांना ताब्यात घेतले आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील याप्रकरणाचा तपास करीत आहे. रामकृष्ण तसेच इतरांवर सुब्रमण्यम यांना मुख्य धोरणात्मक सल्लागार नियुक्त करण्यासाठी प्रशासकीय निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणात हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT