[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="अधिक पहा" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
सिंगापूर; वृत्तसंस्था : सिंगापुरातील एका सुपरमार्केटमध्ये फेअर प्राईजने भारतीय मूळ असलेल्या मुस्लिम कुटुंबाला पवित्र रमजान महिन्यानिमित्त आयोजित उपक्रमात विनामूल्य मिठाई देण्यास थेट नकार दिला. फेअर प्राईजचा कर्मचारी म्हणाला, हा उपक्रम केवळ मलय मुस्लिमांसाठीच आहे. इतरांनाही देऊ एकवेळ; पण भारतीयांना एक तुकडाही मिळणार नाही, असे या कुटुंबाला तेथील कर्मचार्याने सांगितले. एवढे करून तो थांबला नाही. निघा इथून, असे निक्षून सांगितले व भारतीय मुस्लिम कुटुंबाला पुढे एकक्षणही त्याने तेथे थांबू दिले नाही. (No India Only Malay)
जहांबर सालेह (वय 36) हे त्यांची पत्नी फराह नादिया आणि 2 मुलांसह नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसच्या एका सुपरमार्केटमध्ये गेले होते. या मार्केटमध्ये रमजानच्या मुहूर्तावर फेअर प्राईजच्या एका दुकानाचे (आऊटलेटचे) उद्घाटन होते आणि त्यानिमित्त मुस्लिम बांधवांना रोजा (उपवास) सोडण्यासाठी विनामूल्य मिठाई वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याबद्दल सर्व मुस्लिमांसाठी, अशा शब्दांत जाहिरातही करण्यात आली होती. ती पाहून हे मूळ भारतीय मुस्लिम कुटुंब येथे आले आणि त्यांच्या वाट्याला अपमान आला. (No India Only Malay)
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="5" order="ASC" orderby="post_date" view="list" /]
फराह नादिया यांनी फेअर प्राईजचे चित्र सोशल मीडियावर शेअर केले. जहांबर सालेह यांनीही संपूर्ण घटना समाजमाध्यमांतून कथन केली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीच्या विरोधात प्रतिक्रिया येऊ लागल्या. कंपनीने नंतर क्षमायाचना केली. सर्व मुस्लिमांसाठी आमचा हा उपक्रम होता. आम्ही भारतीयांना कमी लेखत नाही. कंपनीने जहांबर सालेह कुटुंबाशीही संपर्क केला. रमजानमध्ये इफ्तार पॅक्स सर्व मुस्लिम ग्राहकांसाठी आहेत, याचा पुनरुच्चार कंपनीने केला व संबंधित कर्मचार्याला समज देण्यात आल्याचेही स्पष्ट केले.
अधिक वाचा :