नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आशिया चषक 2023 कुठे खेळवला जाणार, याबाबत सातत्याने गोंधळ सुरू आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून या वन डे स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आहे, पण बीसीसीआयने पाकिस्तानला संघ पाठवण्यास नकार दिला आहे. (Jay Shah)
अशा परिस्थितीत बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आशिया चषक स्पर्धेच्या ठिकाणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही सध्या आयपीएलमध्ये व्यस्त होतो, पण श्रीलंका क्रिकेट, बांगला देश आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे उच्चपदस्थ अधिकारी आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी येत आहेत. आम्ही चर्चा करू आणि योग्य वेळी अंतिम निर्णय घेऊ, असे जय शहा यांनी पीटीआयला सांगितले. (Jay Shah)
यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचे यजमान पाकिस्तानकडे आहे; परंतु भारतीय क्रिकेट संघ केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय शेजारच्या देशात जाणार नाही, पीसीबीचे चेअरमन नजम सेठी यांनी 'हायब्रीड मॉडेल' प्रस्तावित केले होते जेथे चार खेळ त्यांच्या देशात आयोजित केले जातील.
आशिया क्रिकेट कौन्सिलच्या सूत्रांकडून असे कळले आहे की, सेठी यांचे प्रस्तावित हायब्रीड मॉडेल ज्यामध्ये श्रीलंका, बांगला देश, नेपाळ आणि अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये चार प्राथमिक सामने खेळतील आणि भारत त्यांचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळतील.
मिळालेल्या माहितीनुसार, एसीसीचे प्रमुख जय शहा कार्यकारी मंडळाची बैठक बोलावतील, जिथे या संदर्भात अंतिम घोषणा केली जाईल. पीसीबीला भारताविरुद्ध तटस्थ ठिकाणी खेळण्यास कोणतीही अडचण नाही. आशिया कप 1 ते 17 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
हेही वाचा;