Latest

धोक्याची घंटा : केरळमध्ये वटवाघळांत आढळला निपाहचा विषाणू | Nipah Virus in Kerala

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपाहची भीती कमी झाल्यानंतर एका महिन्यानंतर, राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी आज (दि.२५) सांगितले की, शेजारच्या वायनाड जिल्ह्यातील वटवाघळांवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) केलेल्या  चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. (Nipah Virus in Kerala)

केरळ राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, " वायनाड जिल्ह्यातील सुलतान बथेरी आणि मानथावाडी भागातून गोळा केलेल्या वटवाघळांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत. जॉर्ज पुढे बोलत असताना म्हणाल्या की," आरोग्य सेवक आहेत जे रुग्णांची तपासणी करत असतात, त्यांनी तपासणी करत असताना असताना सावधगिरी बाळगायला हवी. इतर जिल्ह्यांमध्येही निपाहच्या अस्तित्वाबाबत निरीक्षणे आणि अभ्यास करण्यात येत आहेत," घाबरण्याची गरज नाही. प्राणी, पक्षी इत्यादींनी चावलेली फळे खाणे टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ही बामती इकॉनॉमिक टाइम्सने दिली आहे.

निपाहबद्दल हे माहित आहे का? 

  • निपाह विषाणू पहिल्यांदा १९९८ मध्ये मलेशियातील सुंगई निपाह गावात आढळून आला होता. या गावाच्या नावावरून निपाह असे नाव पडले.
  • त्याच वर्षी सिंगापूरमध्येही हा विषाणू आढळला होता. यानंतर २००१ मध्ये बांगला देशात या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले.
  •  २०१८ मध्ये केरळमधील कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यात निपाहमुळे १६ लोकांचा मृत्यू झाला होता.
  • त्याआधी कोचीमध्ये २०१९ मध्ये निपाहचा एक रुग्ण आणि २०२१ साली कोझिकोडमध्येही एक रुग्ण आढळला होता.

लस उपलब्ध नाही

निपाह विषाणूला रोखण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. हा विषाणू थेट मेंदू आणि मज्जासंस्थेवरच हल्ला करतो. त्यामुळे संक्रमित रुग्ण कोमात जाऊ शकतात.

ही आहेत लक्षणे

विषाणूजन्य ताप, डोकेदुखी, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT