पुढारी ऑनलाईन डेस्क : निया शर्मा सध्या 'झलक दिखला जा १०' ची तयारी करत आहे. तिने दोन दिवसांपूर्वी या शोचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. यामध्ये निया ब्लू ड्रेसमध्ये उत्तम डान्स स्टेप करताना दिसत होती. या (Nia Sharma) व्हिडिओमध्ये निया खूप बोल्ड दिसत आहे. 'एक हजारों में मेरी बहना है' आणि 'जमाई राजा' यासारख्या टीव्ही मालिकेतून तिने आपले कलाविश्वातील स्थान पक्के केले. फॅशनमध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग करणारी निया आता हटके लूकमध्ये दिसत आहे. इतकचं नाही तर तिने अशी काही हेअरस्टाईल केली आहे की, सर्वांचेच लक्ष तिच्याकडे वळले आहे. (Nia Sharma)
निया शर्मा खूपच ग्लॅमरस आहे. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. ती नेहमी आपले फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. निया शर्माने एक असा फोटोशूट केला आहे की, ते फोटोज पाहून तिची स्टाईल आणि फॅशन तुम्हा पाहतच राहाल.
नियाने टू पीसमध्ये फोटो शेअर केले आहेत. पांढऱ्या रंगाचा रोझ पॅटर्न क्रॉप टॉप आणि पँट असा पेहराव तिने परिधान केलेला दिसतो. यासोबतच तिची पिंक कलर हेअर स्टाईलदेखील लक्ष वेधून घेते. तिने या फोटोजना It's my 'Not your barbie girl' look. ? अशी कॅप्शन दिलीय.
दोन-तीन दिवसांपूर्वी नियाने ब्लू ग्लिटर ड्रेस घातला होता. यामध्ये निया शर्मा खूप बोल्ड दिसत होती. सिल्वर आणि ब्लू कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये हा ड्रेस खूप कूल दिसत होता. नियाचा मेकअप आस्था अग्रवालने केला होता. हा लूक तिने 'झलक दिखला जा १०' साठी कॅरी केला होता. ती स्पर्धक म्हणून 'झलक दिखला जा १०' मध्ये दिसणार आहे.
हेदेखील वाचा –