nia sharma 
Latest

Nia Sharma : कपड्यांवरून नव्हे तर इतकी गोरी कशी म्हणून ट्रोल झाली निया

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेली निया शर्मा (Nia Sharma) तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीला अनेकदा तिच्या कपड्यांमुळे खूप ट्रोल केले जाते. मात्र यावेळी ती आणखी काही कारणांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीय. तिचे तोकडे कपडे नव्हे तर एका वेगळ्या गोष्टीमुळे तिच्यावर टीका होतेय. (Nia Sharma)

१६ जून रोजी एक स्टाईल आयकॉन इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटमध्ये अनेक मोठे स्टार्स आणि सेलिब्रिटी ग्लॅमरस अवतारात दिसले होते. याप्रसंगी जिथे नियादेखील बोल्ड लूकमध्ये दिसली. निया पुन्हा एकदा तिच्या कूल लूकमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीय. या इव्हेंटमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. ज्यामध्ये तिने बोल्ड मेकअप केला होता आणि तिचे केस खुले ठेवले होते.

काहींनी नियाच्या या लूकचे कौतुक केले तर काहींनी तिला मलायका अरोरा असे म्हटले होते. त्याचवेळी काही सोशल मीडिया यूजर्स तिच्या रंगावर कमेंट करताना दिसले. एका युजरने लिहिले की, ती इतकी गोरी कशी झाली? त्याचवेळी, एकाने नियाची तुलना उर्फी जावेदशी केली.

नियाला 'एक हजारों में मेरी बहना है' या शोमधून प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर ती 'जमाई राजा,' 'नागिन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसली आहे. सोशल मीडियावर खूप सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत नियाचा समावेश होतो. नियाचे सोशल मीडियावरही खूप चाहते आहेत.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT