File photo : Burkinabe gendarmes in the northern city of Ouhigouya, on October 30, 2018. © Issouf Sanogo, AFP / File picture 
Latest

बुर्किना फासो येथील चर्चमध्ये गोळीबार; १५ कॅथलिक उपासकांचा मृत्यू

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बुर्किना फासोच्या एका गावात जवळपास १५ कॅथोलिक उपासकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तरेकडील प्रदेशातील इसाकाने या गावामधील चर्चमध्ये रविवारी (दि. २६) अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. यावेळी मोठ्या प्रमाणात जमा असेलेल्या नागरिकांवर हल्ला केल्याने खळबळ माजली.

इसाकाने या गावातील डोरीच्या कॅथोलिक डायोसीज या चर्चमध्ये रविवारी हा हिंसाचार झाला. या हल्ल्यात दहशतवादी गटातील काहींनी ख्रिश्चन चर्चला लक्ष्य केले तर काहींनी पाद्रींचे अपहरण केले आहे. डोरीच्या कॅथोलिक डायोसीज चर्चचे जनरल ॲबोट जीन-पियरे सावडोगो यांनी या हल्ल्याबाबतची माहिती दिली. सावडोगो यांनी हा एक 'दहशतवादी हल्ला' असल्याचे सांगितले आहे. येथील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार  यामध्ये १२ उपस्थितांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर इतर जखमी तिघांचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला.

बुर्किना फासोचा अर्ध्या भागावर जिहादी गटांचं वर्चस्व

बुर्किना फासोचा अर्धा भाग सरकारी नियंत्रणाबाहेर आहे. कारण जिहादी गटांनी अनेक वर्षांपासून देश उद्ध्वस्त केला आहे. सैनिकांनी हजारो लोक मारले आहेत. २ दशलक्षाहून अधिक लोकांना विस्थापित करण्यात आले आहे. २०२२ मध्ये दोन सत्तापालट झालेल्या देशाच्या स्थिरतेला धोका निर्माण झाल्याचं सध्याचं चित्र आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT