Kenneth Mitchell : कॅप्टन मार्वल फेम अभिनेते केनेथ मिशेल यांचे निधन, 'या' आजारामुळे होते त्रस्त | पुढारी

Kenneth Mitchell : कॅप्टन मार्वल फेम अभिनेते केनेथ मिशेल यांचे निधन, 'या' आजारामुळे होते त्रस्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅप्टन मार्वल फेम हॉलीवूड अभिनेते केनेथ मिशेल यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले. रविवारी २४ फेब्रुवारी रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘स्टार ट्रेक: डिस्कव्हरी’ आणि ‘कैप्टन मार्वल’ सारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये शानदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली. ते एमियोट्रोफिक लेटरल स्क्लेरोसिस( Amyotrophic lateral sclerosis -ALS) आजाराने त्रस्त होते. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी ही दु:खद घटना शेअर केली आहे. अभिनेत्याच्या वेरिफाईड इन्स्टाग्राम पोस्टवर दु:खद वृत्त शेअर करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे- ‘खूप जड अंत:करणाने आणि दु:खासोबत तुम्हाला हे सांगत आहेत की, एक शानदार वडील, चांगले पती आणि भाऊ, काका, मुलगा आणि मित्र असेलेल Kenneth Alexander Mitchell जा जगात राहिले नाही.’ (Kenneth Mitchell)

या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की, केन जवळपास ५ वर्षांपासून ALS च्या आजाराने त्रस्त होते. या पोस्टमध्ये अभिनेत्यासाठी लिहिण्यात आलं आहे की- ते त्या लोकांपैकी होते, जे या सिद्धांतावर चालायचेय प्रत्येक दिवस एका सुंदर गिफ्ट प्रमाणे आणि आम्ही कधी एकटे राहत नाही. त्यांचे आयुष्य या गोष्टीचे उदाहरण आहे की जेव्हा प्रेमाने भरलेले असते, तेव्हा आयुष्य किती परिपूर्ण वाटते.

त्यांच्या निधनानंतर हॉलिवूड चित्रपट इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

Back to top button