नेपाळी शेर्पा गाईड कामी रिता शेर्पा. 
Latest

माउंट एव्हरेस्ट सर करण्‍याचा नेपाळी शेर्पा गाईडने केला विश्वविक्रम!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नेपाळी शेर्पा गाईड कामी रिता शेर्पा यांनी मंगळवारी माउंट एव्हरेस्ट ( Mount Everest) सर
करण्‍याचा विश्‍वक्रम केला आहे. त्‍यांनी जगातील सर्वात उंच शिखर तब्‍बल २८ व्‍यांदा सर करण्‍याचा विक्रम आपल्‍या नावावर केला आहे.

Mount Everest : अशी कामगिरी करणारा ठरला जगातील एकमेव गिर्यारोहक

कामी रीता शेर्पा यांनी सेव्हन समिट ट्रेक्स एव्हरेस्ट मोहीम २०२३ चा भाग म्हणून २८व्यांदा एव्हरेस्ट शिखर सर केले आहे, अशी माहिती या मोहिमेचे आयोजक सेव्हन समिट ट्रेक कंपनीने दिली. यंदाच्‍या मोसमातील त्यांची माउंट एव्हरेस्ट (सागरमाथा) ही दुसरी चढाई आहे, यापूर्वी त्याने १७ मे २०२३ रोजी शिखर सर केले होते.

२ जानेवारी १९७० रोजी जन्मलेल्या कामी रिता शेर्पा हे मुळचे नेपाळमधील सोलुखुंबू येथील थामे गावातील रहिवासी आहेत. सेव्हन समिट ट्रेक्समध्ये वरिष्ठ गाईड ( मार्गदर्शक) म्हणून ते काम करतात. त्‍यांना लहानपणापासूनच गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. मागील दोन दशकांहून अधिक काळ ते माउंट एव्हरेस्ट पर्वत सर करत आहेत.त्यांनी आपले जीवन पर्वतारोहणासाठी समर्पित केले आहे.

कामी रीता शेर्पा यांचा गिर्यारोहण प्रवास १९९२ मध्ये सुरू झाला. तेव्‍हा सपोर्ट स्टाफ सदस्य म्हणून एव्हरेस्टच्या मोहिमेत सामील झाले होते. तेव्‍हापासून त्‍यांची ही मोहित सुरुच आहे. त्‍यांनी K2, चो ओयू, ल्होत्से आणि मनास्लू अशी जगातील आव्‍हानात्‍मक मानली जाणारी शिखरेही सर केली आहे. त्‍यांनी  १३ मे १९९४ रोजी पहिल्यांदा माऊंट एव्हरेस्ट सर केले होते. १९९४ ते २०२३ या कालावधीत त्यांनी २७ वेळा K2 आणि ल्होत्से एकदा, मनास्लू तीन वेळा आणि चो ओयू हे शिखर आठवेळा सर केले होते. त्‍यांच्‍या नावावर 'सर्वाधिक आठ हजार मीटरपेक्षा जास्त चढाई' करण्याचाही विक्रम आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT