Karnataka Politics | भाजप नेते बी. एस. येडियुराप्पांच्या मुलाने घेतली सीएम सिद्धरामय्यांची भेट | पुढारी

Karnataka Politics | भाजप नेते बी. एस. येडियुराप्पांच्या मुलाने घेतली सीएम सिद्धरामय्यांची भेट

पुढारी ऑनलाईन : भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा (Senior BJP leader BS Yediyurappa) यांचे पुत्र आणि आमदार बी. वाय. विजयेंद्र (MLA BY Vijayendra)  यांनी बंगळूरमधील विधान सौधा येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah)
, मंत्री के. एच. मुनियप्पा आणि इतर नेत्यांची भेट घेतली. याबाबतचा व्हिडिओ ANI वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. (Karnataka Politics)

शिकारीपूर मतदारसंघातून बी. एस. येडियुरप्पांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र विजयी झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने १३५ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. त्यानंतर मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार विराजमान झाले.

विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेते विजयी झाले; तर अनेक दिग्गज आणि तब्बल १३ मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यात राज्यातील प्रमुख नेत्यांसह उमेदवारी न मिळाल्यामुळे अन्य पक्षांत प्रवेश करून निवडणूक लढविलेल्या नेत्यांचाही समावेश आहे. राज्यात हायव्होल्टेज लढत ठरलेल्या कनकपुरा मतदारसंघातून काँग्रेसचे डी. के. शिवकुमार हे एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी मंत्री आर. अशोक यांचा पराभव झाला. चन्नपट्टण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी विजयी झाले, भाजपचे सी. पी. योगेश्वर पराभूत झाले. वरुणा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या विजयी झाले असून, तेथे भाजपचे मंत्री व्ही. सोमण्णा यांचा पराभव झाला.

भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करून काँग्रेसकडून रिंगणात उतरून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे भाजपचे महेश कुमठळ्ळी यांच्याविरोधात विजयी झाले. गोकाकमधून रमेश जारकीहोळी यांचा विजय झाला.

हे ही वाचा :

Back to top button