पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे उद्योग व प्रकल्प गुजरातला जाण्याचे सत्र थांबता थांबत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात भर घालणारा देशातील पहिला ५६ कोटींचा पाणबुडी प्रकल्प केंद्र सरकारने गुजरातला हलवण्यात आला आहे. यावरून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने सरकारवर हल्लाबोल केला आहे. (NCP On Government)
राष्ट्रवादीने सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाण्याचे सत्र सुरूच असून, सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देशातील पहिला ५६ कोटींचा पाणबुडी प्रकल्प निवती रॉक्स जवळील समुद्रात येणार होता. मात्र राज्य सरकारच्या अनास्थेमुळे या प्रकल्पाला चालना मिळू शकली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर केला आहे. (NCP On Government)
या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी रोजगाराची संधी देखील आता हुकली आहे. "गुजरातप्रेमी व बेरोजगारीला चालना देणाऱ्या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा जाहीर निषेध" असा हल्लाबोल देखील राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र आणि राज्यातील सरकारवर केला आहे. (NCP On Government)