पुढारी ऑनलाईन डेस्क : अजूनही वेळ गेलेली नाही दादा; नागपूरच्या संत्र्याचा केशरी गोडवा, तुमचीच कारकीर्द आंबट करण्याआधी सावध व्हा, असा इशारा शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. या संदर्भातील पोस्ट राष्ट्रवादीने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून शेअर केली आहे. (NCP On Ajit Pawar)
काल अजित पवार राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित भव्य नारीशक्ती निर्धार मेळाव्याला उपस्थित होते. यावरून 'भावी मुख्यमंत्री' समोरच्या गर्दीत भविष्यातील मुख्यमंत्री पदाची आशा शोधताना दिसत आहेत. जे स्वतःच्या पक्षाचे झाले नाहीत ते विरोधकांच्या बगलेत बसून भविष्याचं स्वप्न पाहत आहेत. तीच बगल घट्ट करत कधी हे सरकार तुमचाच घात करेल सांगता यायचं नाही बुवा, अशा धोका शऱद पवार गटाने अजित पवार यांना दाखवून दिला आहे. (NCP On Ajit Pawar)
अजित पवार यांनी फक्त शब्दच फिरवला नाही, तर शरद पवार यांचा विश्वास तोडलाय. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय. त्यामुळे शब्द जपून वापरायचे असतात आणि ते लक्षातही ठेवायचे असतात, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. शरद पवार गटाने दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द! आणि आज हे 'माजी टीकाकार' मूग गिळून गप्प झालेत, तेही का आणि कशासाठी? असा सवाल देखील अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांना केला आहे. (NCP On Ajit Pawar)