Latest

विधानभवन परिसरात खाली डोकं वर पाय ! शीर्षासन करणारे आमदार संजय दौंड आहेत तरी कोण ?

अमृता चौगुले

बीड; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. या दिवशी दोन्ही पक्ष आक्रमक झाले असतांना शीर्षासन करणारे आमदार संजय दौंड (MLA Sanjay Daund) यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी खाली डोके वर पाय करत राज्यपालांचा निषेध केला. या कृतीनंतर चर्चेत आलेले आमदार संजय दौड यांच्‍याविषयी जाणून घेवूया…

संजय दौंड (MLA Sanjay Daund) यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. जानेवारी २०२० मध्ये त्यांच्या विरोधातील भाजपचे राजन तेली यांनी माघार घेतल्याने दौंड हे बिनविरोध निवडून आले होते. संजय दौंड हे माजीमंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंडितराव दौंड यांचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेचे तिकीट मिळाले.

शीर्षासन का करु शकले दौंड (MLA Sanjay Daund)

संजय पंडितराव दौंड यांचे परळी तालुक्यातील दौंडवाडी हे मूळगाव. या ठिकाणी त्यांची व्यायामशाळा असून ते दररोज एक तास व्यायाम करतात. व्यायामाची आवड असल्याने त्यांची शरीरयष्टी तंदुरुस्त आहे.

जिल्हा परिषदेत ठसा उमटवला (MLA Sanjay Daund)

अनेक वर्षांपासून संजय दौंड बीडच्या राजकारणात सक्रीय आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजेच जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांचा अनुभव तसेच राजकीय पार्श्वभूमीमुळे त्यांना दौंड यांना विधान परिषद सदस्यत्व मिळाले.

राज्यपालांनी राज्याचा अपमान केला आहे : संजय दौंड

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चांगलं काम केलं आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. परंतु, त्यांनी आपले अभिभाषण पूर्ण केलं नाही. अभिभाषणात शासनाची भूमिका राज्यपाल मांडत असतात. हे काम विरोधकांना ऐकायचं नव्हतं. राज्यपालांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यपाल राष्ट्रगीत न होता निघून गेले. त्यांनी या राज्याचा अपमान केला आहे. त्यांचा मी धिक्कार करतो. त्यांचा निषेध म्हणून मी खाली डोकं वर पाय केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT