Latest

Nayanthara Wedding : नयनतारा बॉयफ्रेंड विग्नेश शिवनसोबत अडकली लग्न बंधनात

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क: दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा तिचा बॉयफ्रेंड विग्नेश शिवनसोबत लग्न बंधनात ( Nayanthara Wedding ) अडकली. हा विवाह सोहळा महाबलीपुरम येथील एका रिसॉर्टमध्ये पार पडला असल्याची माहिती सुत्राकडून मिळालेली आहे. या विवाह सोहळ्यात नवदाप्त्यांना आशिर्वाद देण्यासाठी बॉलिवूड, साऊथ स्टार्सपासून दिग्गज नेते पोहोचले आहेत. या विवाहाची गेल्या अनेक दिवसापासून जोरदार तयारी सुरू होती.

अभिनेत्री नयनताराने तिच्या इंन्टाग्रामवर नुकतेच विवाहातील ( Nayanthara Wedding ) काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी नयनतारा भरजरी दागिन्यासोबत लाल रंगाच्या साडीत अप्रतिम दिसते. तर विग्नेशने साऊथ लूक म्हणजे, पांढऱ्या रंगाचा शर्ट, धाेती आणि उपरण अशी वेषभूषा केली हाेती. या नववधू,वरांच्या लूकमध्ये दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत.

शेअर केलेल्या फोटोत दोघांच्या गळ्यात वरमाळा असून ते आनंदीत दिसतात. यातील एका फोटोत खास करून, विग्नेशने नयनताराला प्रेमाने किस केल्याचे दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'With God's grace , the universe , all the blessings of our parents & best of friends ?❤️'. असे लिहिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबलीपुरम येथील एका रिसॉर्टमध्ये लग्न सोहळ्याचे आयाेजन केले आहे. हे रिसॉर्ट भव्यदिव्य असून सुमारे १२९ खोल्याचे आहेत. या विवाहाला साऊथ इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्ससोबत दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यात रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी, सुरिया, अजित, कार्ती, विजय सेतुपती आणि समंथा रुथ प्रभू यांसारख्या दाक्षिणात्य सेलिब्रिटीचा समावेश आहे. नयनतारा आणि तिचा बॉयफ्रेंड विग्नेशने पहिल्यांदा या विवाहाबाबत कोणताही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. मात्र, लग्नाच्या काही तासाच्या आधीच विग्नेश एक पोस्ट शेअर करून यांची माहिती दिली आहे. यावेळी त्याने दोघांचा एक रोमॉटिक फोटो शेअर केला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने 'आजचा दिवस खास आहे. कारण आज ९ जून असून नयनताराचा दिवस आहे. देवाचे, विश्वाचे आणि आमच्यासाठी चांगले विचार करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानतो. चांगली माणसे, चांगले क्षण, चांगले योगायोग आणि प्रत्येकाच्या आशीर्वादाने आपले जीवन सुंदर बनवले आहे. आशीर्वाद आणि प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार. हे सर्व प्रेम नयनताराला समर्पित करत आहे. तुला पाहून मी खूप उत्सूक आहे. आज मी माझे कुटुंब आणि मित्रांसमोर जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. असे लिहिले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी नवदाप्त्यांला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. नयनतारा आणि विघ्नेश शिवन अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांची पहिली भेट 'नानुम राउडी धान' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. विघ्नेशने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यानंतर एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान दोघांनी त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती. यानंतर आता दोघेजण विवाह बंधनात अडकले.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT