नवी मुंबई ; पुढारी वृतसेवा नवी मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंग केली असून, 24 तासात एकूण 216.42 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात 14 ठिकाणी झाडे पडली आहेत. एका ठिकाणी सज्जा कोसळण्याची घटना घडली आहे. मोरबे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात एकूण 43 मिमी पावसाची नोंद झाली. सध्या स्थितीला मोरबे धरणाची पातळी 68.30 मीटरपर्यंत पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली, तर वाशी टोल नाक्यावर कंटेनरचा अपघात झाला. काही सखल भागात पाणी साचले होते. पंपाच्या सहाय्याने तातडीने पाण्याचा उपसा करण्यात आला. गटारांना लोखंडी जाळ्या लावण्याचे कामही हाती घेतले आहे. तुर्भे पोलीस ठाण्याच्या समोरील जुन्या आणि उरणफाटा उड्डाणपूलावर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाने हे खड्डे बुजवले नसल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. शहरात कुठेही पाणी तुंबणार नाही, यासाठी घनकचरा विभागामार्फत साफ सफाई कर्मचारी तैनात केले आहेत.
25 जून 08:30 am ते 26 जून 08:30 am
बेलापूर 39.20 मिमी
नेरूळ 42.20 मिमी
वाशी 47.00 मिमी
कोपरखैरणे 72.00 मिमी
ऐरोली – 64.80 मिमी
दिघा 59.00 मिमी
24 तासात सरासरी पावसाची नोंद – 216.42 मिमी
झाडे कोसळली – 14
सज्जा कोसळणे – 01
मोरबे धरण – 43.00 मिमी
एकूण पाऊस – 151.20 मिमी
मोरबे धरणाची पातळी – 68.30 मीटर
हेही वाचा :