नाशिक शहरात गणपतीची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकीच गोदावरी नदीच्या किनारी असलेलं नवश्या गणपती हे एक पेशवे कालीन व ऐतिहासिक मंदिर आहे. श्री नवश्या गणपती मंदिराला तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास आहे. नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती आहे. नवसाला पावतो म्हणून राज्यभरातून गणेशभक्त याठिकाणी येत असतात. गणेशोत्सवातही भाविक भक्तांची मोठी गर्दी याठिकाणी होत असते. आपण याच नवश्या गणपतीचा इतिहास जाणून घेणार आहोत…(Nashik Navshya Ganpati)
काय आहे इतिहास ?
श्री नवश्या गणपती मंदिर हे आनंदवल्ली येथील अत्यंत जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे.
या मंदिराला तीनशे ते चारशे वर्षांचा इतिहास आहे. इ. स. १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवल्ली हे आजोळ असलेले गांव. त्यांच्या मातोश्री गोपीकाबाई या नवश्या गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या. राघोबा दादा व आनंदीबाईस १५ ऑगस्ट १७६४ रोजी मुलगा झाला. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. या मुलाच्या जन्म प्रित्यर्थ चावंडसचे नाव बदलून आनंदवल्ली ठेवण्यात आले. दरम्यान नवश्या गणपती मंदिराची उभारणी करण्यात आली. (Nashik Navshya Ganpati)
गोदावरीच्या तिरी पुर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेश मुर्ती आकर्षण आहे. या गणेशाला चार हात असून त्यात पाश, मोदक, फुल व आशिर्वाद देतात. प्रत्येक हातात कडे आहे. मुळ मुर्तीच्या डोक्यावर मुकूट आहे. राघोबा दादांनी आनंदवल्लीस मोठ्ठा राजवाडाही बांधला. या राजवाड्याच्या पश्चिमेस उभे राहिल्यानंतर श्री नवश्या गणपतीचे दर्शन होत असे. इ. सन १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडवीली. त्यावेळी त्यांनी आनंदवल्लीचा वाडाही जाळला. मात्र परिसरातील मंदिरे शाबुत राहिली. श्री नवश्या गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कार्य किर्तींची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे.
हेही वाचा :