नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजप ने गुगल वरील जाहिरातीत कॉंग्रेसच्या तुलनेत सहा पट अधिकचा खर्च केला आहे. ऑनलाईन जाहिरातबाजीत तामिळनाडूतील प्रादेशिक पक्ष द्रविड मुन्नत्रे कडघम (डीएमके) आणि भारतीय जनता पार्टी आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे 'गुगल ट्रान्सपरन्सी'च्या अहवालानूसार भाजप ने फेब्रुवारी २०१९ ते आतापर्यंत १७.६३ कोटी रूपयांच्या जाहिराती गूगलच्या विविध प्लॅटफॉर्मवर दिल्या आहेत. कॉंग्रेसने दरम्यानच्या काळात केवळ ३ कोटींच्या जाहिराती दिल्याची अहवालातून समोर आले आहे.
अधिक वाचा : Twitter ने अखेर तक्रार अधिकारी नेमला; नव्या आयटी मंत्र्यांच्या इशाऱ्याने तीन दिवसात उपरती!
भाजपने कॉंग्रेसच्या तुलनेत गूगलवरील प्रचारात सहा पटीने अधिक खर्च केला. महाराष्ट्र प्रदेश भाजपने गूगलवर स्वतंत्ररित्या १.०६ कोटी रूपये जाहिरातीवर खर्च केले.
महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने यादरम्यान केवळ ३५ लाख रूपयेच जाहिरातीवर खर्च केले.
कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने एम दरम्यानच्या काळात केवळ १७.०४ लाख रूपये खर्च केल्याची माहिती अहवालातून देण्यात आली आहे.
गुगलवरील जाहिरातीवर सर्वाधिक खर्च करणारा पक्ष डीएमके ठरला आहे.
तामिळनाडूतील एक प्रादेशिक पक्ष असून देखील डीएमके ने या दरम्यानच्या काळात २२.२५ कोटी रूपये खर्च केले आहे. भाजपलाही डीएमकेने मागे टाकले आहे.
डीएमकेची प्रतिस्पर्धी पक्ष एआयडीएमकेने यादरम्यानच्या काळात ७.३१ कोटी रूपये खर्च केले आहे. तामिळनाडूत एप्रिल २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक पार पडली होती.
प्रादेशिक पक्षांनी त्यामुळे ऑनलाईन जाहिरातीवरही बऱ्यापैकी खर्च केल्याचे दिसून आले आहे.
क्षेत्रनिहाय प्रादेशिक पक्षांनी गूगलवर केलेल्या जाहिरातीकडे दृष्टिक्षेप टाकला तर तामिळनाडूतील राजकीय पक्ष समोर असल्याचे दिसून आले आहे.
निवडणुकीचे वर्ष असल्याने तामिळनाडूत ३४.६३ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहे.
तामिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्र ७.७६ कोटी, दिल्ली ६.९६ कोटी, आंध्रप्रदेश ५.४४ कोटी खर्च केले आहेत. बिहार ४.५१ कोटी तसेच मध्य प्रदेशातील पक्षांकडून २.६० कोटी खर्च करण्यात आले आहेत.
यासह ओडिशा ४.८ कोटी, राजस्थान २.६० कोटी, तेलंगणा २.६४ कोटी, उत्तर प्रदेश २.९० कोटी खर्च केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ५.०९ कोटी रूपये जाहिरातीवर खर्च करण्यात आल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे.
हे ही वाचलं का?
मेडिक्लेम पर्याय काय आहेत? पाहा व्हिडिओ
https://youtu.be/mYHb7fjSA0E