राष्ट्रीय

पं. नेहरू, वाजपेयी आदर्श नेते; केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गौरवोद्गार

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क: माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते होते, अशी गौरवोद्गार केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. आपली लोकशाही समृद्ध करण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, सन्मानाने वागले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

एका खासगी वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पं. नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी हे दोघेही लोकशाही मानणारे नेते होते.

'माझ्या लोकशाहीचे सन्मानाने पालन करीन असे ते म्हणायचे.

'अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भारतीय लोकशाहीमध्ये मोठे योगदान होते.' असे गडकरी म्हणाले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गदारोळामुळे कामकाजात बाधा आली.

अधिवेशनादरम्यान संसदेत तीन कृषी कायद्यांविरोधात, इंधन दरात वाढ आणि पेगासस या प्रकरणांवरून दोन्ही सभागृहांत विरोधकांनी गोंधळ घातला.

विरोधकांनी चर्चेची मागणी केली तर सरकारने ती फेटाळून लावली.

यावर ते म्हणाले, 'सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करावे लागेल. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असेल.

आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार. त्यामुळे आमच्या भूमिका बदलत राहतात. महाराष्ट्रात एक वेळ अशी होती जेव्हा आम्ही सभागृहात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता.

त्या दिवसांत एकदा मी अटलजींना भेटलो आणि त्यांनी मला सांगितले की ,लोकशाहीत काम करण्याचा हा मार्ग नाही.

लोकांपर्यंत तुमचा संदेश पोहोचवणे महत्त्वाचे आहे.

सत्तेतील आणि विरोधी पक्षातील सर्व पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. मी सुद्धा पक्षाचा अध्यक्ष राहिलो आहे.

सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी एकदा आत्मपरीक्षण केले पाहिजे.

विरोध आवश्यक

सत्ताधारी आणि विरोधकांना लोकशाहीची दोन चाके असे म्हणतात असे सांगत केद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, 'ही लोकशाही यशस्वी करण्यासाठी सशक्त विरोधीपक्ष देखील आवश्यक आहे.

नेहरूंनी वाजपेयीजींचा नेहमीच आदर केला आणि ते म्हणाले की 'विरोध देखील आवश्यक आहे.

म्हणून काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून मजबूत झाला पाहिजे आणि विचारधारेच्या आधारावर त्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT