राष्ट्रीय

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर दैनंदिन जीवनात कसा वाढला

निलेश पोतदार

सध्याचा जमाना कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा (एआय) आहे. जगभर इंटरनेटपेक्षा तिप्पट गतीने 'एआय'चा प्रसार होत आहे हे विशेष. आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर दैनंदिन जीवनातील सर्वसामान्य उपकरणांपासून ते अतिशय महत्त्वाची कामे करू शकणार्‍या अद्ययावत उपकरणांपर्यंत होऊ लागला आहे.

एआयच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वापरासंबंधीची ही माहिती…

•कसे काम करते? : 'एआय' असलेल्या 'स्मार्ट मशिन्स'ना मानवाप्रमाणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते.

त्यासाठी अशा यंत्रांना प्रशिक्षण दिलेले असते. त्याला 'मशिन लर्निंग' किंवा 'एमएल' असे कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोगम्हणतात. मात्र, एखादे यंत्र तितकेच काम करते जितके त्यामध्ये लिखित कोड भरलेले असते.

जर या कोडच्या मागचे-पुढचे काही सांगितले तर मशिनला ते समजत नाही.

ऑडिओ ऐकवून विशेष प्रशिक्षण

विशेष प्रशिक्षण ः मशिनला ऑडिओ ऐकवून किंवा छायाचित्र दाखवूनही सध्या प्रशिक्षण दिले जात आहे.

या यंत्रांना आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क मॉडेल बनवून ट्रेनिंग दिले जाते. मानवी मेंदूसारखे काम करणारे हे मॉडेल असतात.

त्यांच्या सहाय्याने ही यंत्रे एखाद्या लहान मुलाप्रमाणे जगाकडे पाहतात. त्यांच्याप्रमाणेच शिकतात, ऐकतात व नव्या गोष्टी समजून घेतात.

• आरोग्य क्षेत्र :

'डीपआयऑटिक्स' नावाच्या कंपनीने 'कोव्हिड-19' साठी 'एआय एक्सरे अ‍ॅप्लिकेशन' बनवले आहे.

एक्सरे, टेम्परेचर, ऑक्सिजन पाहून हे अ‍ॅप सामान्य न्यूमोनिया आणि 'कोव्हिड-19' मधील फरक सांगते. महाराष्ट्र सरकारने याचा वापरही केला आहे.

कोरोना काळात आंध— प्रदेश आणि तेलंगणाच्या दुर्गम परिसरांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने औषधे पोहोचवण्यात येत आहेत.

त्यामध्ये 'एआय'च्या माध्यमातून ड्रोनला कोणत्या ठिकाणी औषध पुरवठा करायचा आहे याची सूचना दिली जाते.

बंगळूरमधील एक स्टार्टअप कॅनडाच्या वैज्ञानिकांच्या सहाय्याने सीटी स्कॅन रिपोर्ट समजून घेणारे एआय मोबाईल अ‍ॅप बनवत आहे.

•कृषी क्षेत्र : 'एआय'वर पीएच.डी. केलेल्या डॉ. भावना निगम यांनी सांगितले की दरवर्षी हजारो हेक्टर जागेत पिके खराब होऊन जातात.

मात्र, 'एआय'युक्त यंत्रे पानांमधील किरकोळ बदलही टिपून शेतकर्‍यांना पिकावर कोणता परिणाम होईल हे सांगू शकतात.

त्यामुळे पीक वाचवण्यासाठी काय करायला हवे हे वेळीच समजू शकते. सध्या दक्षिण भारतातील अनेक शेतकरी अशा यंत्रांचा वापर करीत आहेत.

नारळाच्या झाडावरील नारळांची मोजणी करण्यासाठीही 'एआय'चा वापर होत आहे.

विमान वाहतूक :

• विमान वाहतूक : जगभरातील विमानांची वाहतूक कॉम्प्युटरवर अवलंबून आहे.

कोणते विमान कधी व कोणत्या मार्गाने जाईल हे माणूस ठरवू शकत नाही.

हे सर्व यंत्रेच सांगतात. प्रवाशांचे साहित्य विमानातून बाहेर आणण्यापर्यंतचे सर्व निर्देश अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा असलेल्या यंत्रांच्या सहाय्यानेच दिले जात असतात.

•अंध लोकांना मदत ः

नोटाबंदीनंतर अंध लोकांसाठी एक समस्या निर्माण झाली होती. नव्या 500 व 2 हजारच्या नोटांना स्पर्श करून त्यांचा अंदाज लावणे कठीण झाले होते.

त्यावेळी 'डीपआयऑटिक्स'ने 'माय आईज' नावाचे एक मोबाईल अ‍ॅप बनवले. ते मोबाईलच्या फ्रंट कॅमेर्‍याचा वापर करते आणि सांगते की हातातील नोट किती रुपयांची आहे. केवळ नोटाच नव्हे तर मार्गात येणार्‍या प्रत्येक वस्तूची माहिती हे अ‍ॅप देऊ शकते.

सुपरमार्केट :

दिल्लीच्या काही मॉलमध्ये 'एआय' मशिन बसवण्याची तयारी सुरू आहे.

त्यासंबंधी काम करणार्‍या अधिकार श्रीवास्तव यांनी सांगितले की एखादे सामान कोणत्या शेल्फमध्ये ठेवल्याने त्याची विक्री वाढू शकते याचीही माहिती अशी यंत्रे देऊ शकतात हे विशेष!

ग्राहकांच्या सोयीसाठीही ही यंत्रे अनेक प्रकारे मदत करू शकतात.

दुग्ध उत्पादन : दक्षिण आफ्रिकेत दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी जनावरांना इंजेक्शन दिले जात नाही.

तिथे डीप लर्निंग मशिनची मदत घेतली जाते. गर्भार अवस्थेतच दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठीची माहिती गोळा केली जाते.

तेथील शेतकरीही पीक उत्पादन वाढवण्यासाठी डीप लर्निंगचा वापर करीत आहेत. त्यामुळे त्यांना कधी पेरणी करावी आणि कधी खत घालावे याचेही मार्गदर्शन मिळते.

• कारखाने :

'फ्रंटलाईन'ने मशिन लर्निंग आणि डीप लर्निंग यावर एक डॉक्युमेंटरी बनवली आहे.

तिचे नाव 'इन द एज ऑफ एआय' म्हणजे 'कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात' असे आहे. यामध्ये चीन आणि सौदी अरेबियात कोणत्याही मदतीशिवाय चालणार्‍या ट्रक आणि मोटारींना दर्शवण्यात आले आहे.

कारखान्यांमध्ये काम करणारे हे ट्रक ऑटो ड्राईव्ह मोडमध्ये असतात. दुबईत तर ऑटो ड्राईव्ह मोटारीही आल्या आहेत.

मानसोपचार : डीप लर्निंगची उत्पादने बनवणार्‍या 'ब—ेन टॉय' या कंपनीचे संस्थापक अमित यांनी सांगितले की अमेरिका आणि युरोपमध्ये डीप लर्निंगचा वापर सर्वाधिकपणे आरोग्य क्षेत्रात होत आहे.

त्यामध्येही मेंटल हेल्थ म्हणजेच मानसिक आरोग्यासंबंधी क्षेत्रात मानसोपचाराबाबत होत आहे.

राजकीय क्षेत्र : कॅनडात राजकीय नेतेही आता डीप लर्निंगची मदत घेत आहेत. त्यामधून त्यांना भविष्यातील राजकारणाचा हवा कुठल्या दिशेने असेल हे समजू शकते.

याबरोबरच औषधे तयार करणे, नवी रसायने शोधणे, खाणकाम यांच्यापासून अंतराळ संशोधन आणि शेअर मार्केटसाठीही अचूक अनुमान लावण्यासाठी अशी 'एआय' युक्त यंत्रे मदत करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT