राष्ट्रीय

Agnipath Recruitment Scheme : ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये तरुण आक्रमक; वाहतूक ठप्प, रेल्वेचा डबा पेटवला

अविनाश सुतार

पाटणा: पुढारी ऑनलाईन : भारतीय लष्करात भरती होण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावित अग्निपथ योजनेविरोधात (Agnipath Recruitment Scheme) बिहारच्या अनेक भागांमध्ये तरुणांनी निदर्शने केली. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. भभुआ रोड रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि एक डबा पेटवून दिला. 'भारतीय सैन्य प्रेमी' असे बॅनर हातात धरून त्यांनी नवीन भरती योजनेविरोधात घोषणाबाजी केली.

(Agnipath Recruitment Scheme) आराह येथील रेल्वे स्थानकावर, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आंदोलकांच्या प्रचंड जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडव्या लागल्या. आंदोलकांनी रुळांवर फर्निचर फेकल्यामुळे आणि पेटवून दिल्याने आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक साधनांचा वापर केला.

जेहानाबादमध्ये, तरुणांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांसह अनेक लोक जखमी झाले. रेल्वे स्थानकावर पोलीस आणि आंदोलक एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत. आंदोलकांना घाबरवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या बंदुकाही दाखवल्या.

नवाडा येथे, तरुणांच्या गटांनी सार्वजनिक क्रॉसिंगवर टायर जाळले आणि टूर ऑफ ड्यूटी योजना मागे घेण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. त्यांनी नवादा स्थानकात रेल्वे रुळ रोखून धरले आणि ट्रॅकवर टायर जाळले. अनेक आंदोलक रेल्वे रुळांवर पुशअ्प करताना दिसत आहेत. तर पोलीस आंदोलकांना शांततेचे आवाहन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, अग्निपथ, टूर ऑफ ड्यूटी योजनेत चार वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी आधारावर जवानांची भरती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बहुतेकांना ग्रॅच्युइटी आणि पेन्शन लाभांशिवाय सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे. त्यामुळे पगार आणि पेन्शनमध्ये बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच शस्त्रास्त्र खरेदीसाठी निधी जमवणे ही मूळ उद्देश या योजनेचा आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT