Year 2027 Predictions pudhari
राष्ट्रीय

Year 2027 Predictions: नव्या वर्षात जगात मोठी उलथापालथ... १० भविष्यवाण्या ज्यामुळं लोकांचे आयुष्य साय-फाय चित्रपटासारखं बदलणार

द इकॉनॉमिस्टच्या द वर्ल्ड अहेड २०२७ चे संपादक टॉम स्टँडेज यांनी येणाऱ्या काळातील १० महत्वाचे इशारे दिले आहेत.

Anirudha Sankpal

Year 2027 Predictions: आगामी २०२७ हे वर्ष जगासाठी मोठे बदल आणि उलथापालथ घेऊन येण्याची शक्यता आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतरचा काळ सुरू होणार आहे. तसेच इराण युद्धामुळे जगातील राजकारण आणि अर्थकारण देखील मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे. AI बद्दल देखील मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंग, तैवान, चीन स्पेसमधील व्यापार हे मुद्दे देखील आगामी वर्षात चर्चेत असणार आहे.

द इकॉनॉमिस्टच्या द वर्ल्ड अहेड २०२७ चे संपादक टॉम स्टँडेज यांनी येणाऱ्या काळातील १० महत्वाचे इशारे दिले आहेत. स्टँडेजच्या मते, 'आधुनिक युगात वेगाने सायन्स फिक्शन चित्रपटासारखे बदल होण्याची शक्यता आहे. अंतराळात कॉम्पुटर बसवण्याची योजना करणाऱ्या रॉकेट व्यापारी जगातील पहिले ट्रेलिनियर झाले आहेत. ड्रोनमुळे युद्ध लढण्याचे तंत्रच बदलणार आहे. टॅक्सी स्वयंमचलित होणार आहेत. AI मॉडेल अनपेक्षित व्यवहार करू लागतील. मानवासारखे दिसणारे रोबोट वेगाने वाढतील. चला तर मग जग बदलणारे हे १० बदल काय असतील हे पाहुयात..

१ ट्रम्प नंतरच्या युगाची सुरूवात

अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा जोर धरू शकते. टॉम स्टँडेज यांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांना दुबळा राष्ट्रपती मानने घाईचे ठरले. ते आपली राजकीय पकड आणि लेगसी मजबूत करण्यासाठी सक्रिय राहू शकतात.

२ इराण संघर्षाचे परिणाम

इराणसोबतच्या संघर्षाचे स्पष्ट असे कोणते उत्तर लवकर मिळेल याची शक्यता नाही. त्यामुळं २०२७ मध्ये याबाबतची अनिश्चितता कायम राहील. ट्रम्प यांच्या या युद्धामुळे अमेरिकेची ग्लोबल पोजिशनिंग कमजोर झाली आहे. अमेरिकेवरचा त्याच्या सहकारी देशांचा विश्वास डळमळू शकतो. आता अमेरिकेची भीती पहिल्या सारखी राहणार नाही. या संघर्षामुळे पश्चिम आशियाच्या राजकीय तसेच जागतिक उर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अन्न सुरक्षेबाबत देखील समस्या वाढू शकतात.

३ सलग दुसरे उष्ण वर्ष

२०२७ मध्ये रेकॉर्ड ब्रेक तापमान राहू शकते. इकॉनोमिस्टच्या मते, सुपर अल नीनोची स्थिती जगाला आगामी वर्षात देखील जास्त उष्ण टेवू शकते. यामुळे दुष्काळ, प्रचंड उष्णता आणि मोठे वणवे यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जर कार्बन उत्सर्जनमध्ये वेगाने घट झाली नाही तर अडचणी वाढू शकतात.

४ AI विरूद्ध नाराजी

आर्टिफिशयल इंटेलिजन्सबाबत जगभरात चर्चा वाढू शकते. तसेच AI कंपन्यांच्या क्लिष्ट आर्थिक व्यवहार आणि वाढत्या कर्जांमुळे बाजारात आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. तसेच जास्त सक्षम AI मॉडेलमुळे सायबर हल्ले अजून गंभीर होतील. सरकार आणि कंपन्या AI सप्लाय चेनशी संबंधित राजकीय धोका देखील चिंतेचा विषय असेल.

५ फ्रान्समध्ये डाव्यांचे राजकारण प्रबळ

जगात अनेक ठिकाणी डाव्या विचारसरणीच्या राजकारणाचा प्रभाव वाढताना दिसेल. २०२७ मध्ये फ्रान्सवर विशेष नजर असणार आहे. डाव्या नॅशनल रॅलीच्या नेत्या मरीन ले पेन यांच्याकडे राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्याची चांगली संधी असणार आहे. असं झालं तर युरोपीयन युनियच्या राजकारणावर याचा मोठा प्रभाव पडणार आहे.

६ सरकारी कर्ज वाढेल

२०२७ मध्ये श्रीमंत देशांच्या सरकारांसाठी कर्ज महागण्याची शक्यता आहे. यामागे सरकारी खर्च, AI साठी मोठ्या प्रमाणात इन्फ्रा आणि ऊर्जा यांच्या किंमती वाढण्याने महागाई देखील वाढण्याची शक्यता आहे. बॉन्ड बाजारात वाढता दबाव सरकारी उधारी वाढवू शकते. जास्त व्याजदराचा प्रभाव फक्त सरकारपर्यंत मर्यादित राहणार नाही. कंपन्या आणि सामान्यांवर देखील याचा आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे.

७ तैवानबीबत चीनवर नजर

युक्रेन आणि इराण संघर्ष पाहता नव्या युद्ध नितीने सर्व गोष्टी बदलल्या आहेत. आता छोटे देश देखील मोठ्या लष्करी ताकदींना जेरीस आणत आहेत. अशात चीन तैवानबाबत काय भूमिका घेते याकडे अख्ख्या जगाचे डोळे लागलेले असतील. शी जिंगपिंग २०२७ पर्यंत तैवानवर कब्जा करण्यासाठी चीनी लष्कराला तयार राहण्याचे टार्गेट दिल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेचे लक्ष देखील सध्या दुसऱ्या गोष्टींकडे आहे.

८ वजन कमी करण्याच्या औषधांचा बाजार बदलेल

वजन कमी करण्याच्या औषधांचा फक्त लोकांच्या आरोग्यावर आणि जीवनशैलीवर नाही तर त्याच्या आर्थिक व्यवहारावर देखील परिणाम होणार आहे. या औषधांच्या मदतीने वजन घटवणाऱ्या लोकांना नीवन आयुष्य मिळाल्याची भावना निर्माण होत आहे. यानंतर कपडे, कॉस्मेटिक्स आणि फिटनेसबाबत देखील जास्त खर्च वाढेल. याला रिव्हेंज शॉपिंग असं म्हटलं जातं. या औषधांच्या यशामुळे औषध कपंन्यांची आयुष्य वाढवणाऱ्या आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत करणाऱ्या थेरपी विकसीत करण्याकडे कल वाढेल.

९ सॅटेलाईट लाँचिंग होणार स्वस्त

२०२७ मध्ये अंतराळ उद्योग देखील नव्या शक्यता घेऊन येऊ शकतो. स्पेसेक्सच्या मोठ्या स्टारशिप नियमित स्वरूपात सॅटेलाईट लाँच करायला सुरू करतील. चीनची रॉकेट कंपन्यांना देखील बूस्टर मिळू शकतो. ते देखील पुन्हा वापरता येईल असं बूस्टर तंत्रज्ञान विकसित करू शकते. अंतराळात खासगी अंतराळ स्टेशन सुरू होऊ शकते. तसेच डेटा सेंटर देखील सेटअप होऊ शकते.

१० हॉलीवडूमध्ये जुन्यांची चलती

२०२७ मध्ये हॉलीवूडमध्ये मोठे चित्रपट आणि फ्रेंचायजी यांच्यावर देखील आगामी वर्षात नजर असेल. स्टार वॉर्स रिलीजचे ५० वर्षे पूर्ण होणार असून ते पुन्हा रिलीज केले जाऊ शकतात. तसेच फ्रेंचायजी नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतो. एव्हेंजर्सची देखील वापसी होऊ शकते. नवा जेम्स बाँड देखील पडद्यावर दिसेल. मात्र या मोठ्या फ्रेंचायजींसमोर ओटीटी आणि लो बजेट युट्यूब कंटेटचे मोठे आव्हान असणार आहे. लोकांकडे आता अधिक स्वस्त पर्याय उपलब्ध असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT