पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीत पतीसोबत भांडण झाल्यानंतर एका महिलेने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापून पळ काढला. पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतक पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित पुरुष बिहारच्या मधुबनी येथील रहिवासी आहे. चार-पाच महिन्यांपूर्वीच तो पत्नीसह दिल्लीला शिफ्ट झाला होता. दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर पत्नीने आपले गुप्तांग कापले, असा आरोप पीडित पतीने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी सांगितले की, पीडित पतीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी महिला सध्या फरार असून तिला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर आणि 01 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2:34 वाजता रूप नगर पोलिस स्टेशनला एका महिलेने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट चाकूने कापून पळ काढल्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. चंद्रवळ येथील पीडित पतीला जखमी अवस्थेत बडा हिंदूराव रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले.
दिवाळी पाडव्या दिवशी पीडित विष्णूचा जबाब नोंदवण्यात आला. पीडित विष्णूने आपल्या जबाबामध्ये सांगितले की, तो बिहारमधील मधुबनी येथील रहिवासी आहे. आणि 4-5 महिन्यांपूर्वी पत्नीसह दिल्लीला शिफ्ट झाले. तो शक्तीनगर येथील पीजीमध्ये हेल्पर म्हणून काम करतो. ३१ ऑक्टोबरच्या रात्री तो दारूच्या नशेत होता. काही कारणावरून त्याचे पत्नीशी भांडण झाले. भांडणानंतर त्याची पत्नी घरातून निघून गेली आणि तो झोपायला गेला. काही वेळाने त्यांच्या पत्नीने घरात घुसून त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार वस्तूने वार केले. या घटनेनंतर त्याची पत्नी फरार झाली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.