मुंबई : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूडचा प्रसिध्द चित्रपट निर्माता साजिद खान पुन्हा एकदा वादात सापडला आहे. साजिदवर अभिनेत्री शर्लिन चोप्राने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. शर्लिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करून सांगितले आहे. ती म्हणाली, साजिद खानने भेटीदरम्यान खूप घाणेरडा प्रकार केला. सहा वर्षांपूर्वी जेव्हा ती साजिद खानला भेटली होती, तेव्हा त्याने लैंगिक शोषण करण्याचा प्रकार केला.
शर्लिनने लिहिलं, 'जेव्हा मी माझ्या वडिलांच्या निधनानंतर एप्रिल २००५ मध्ये त्याला (साजिद) भेटली होती. तेव्हा त्याने आपल्या पँट्समधून प्रायव्हेट पार्ट काढून ते फील करण्यास सांगितले. मला आठवतं की, मी त्याला म्हटलं होतं की, मला माहिती आहे की, प्रायव्हेट पार्ट कसं असतं आणि मी तुम्हाला भेटण्यामागचा उद्देश्य असं करणं अजिबात नाही.'
याआधी जिया खानची बहिण करिश्मानेदेखील साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तिने म्हटलं होतं की, "रिहर्सलची वेळ होती. जिया स्क्रिप्ट वाचत होती. त्यावेळी साजिदने जियाला टॉप काढण्यास सांगितले होते. तिला समजत नव्हतं की, काय करायचं आहे. ती म्हणाली की, चित्रपटाचे शूटिंग सुरू झालेले नाही आणि हे सर्व होत आहे. ती घरी येऊन रडू लागली. ती म्हणत होती की, ती या चित्रपटाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. त्यामुळे जर हा चित्रपट सोडला तर ते माझ्याविरोधात केस करेल आणि तिची बदनाम करेल.
२०१८ मध्ये जेव्हा मीटू मोहीम सुरू झाले होते. तेव्हा साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.