Woman TTE Train Dispute Viral Video Pudhari
राष्ट्रीय

Train Ticket Dispute: तिकीट मागताच महिलेचा TTE सोबत राडा; स्वतःचे कपडे फाडले अन् पोलिसांना फोन केला, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Woman TTE Train Dispute Viral Video: ट्रेनमध्ये तिकीट तपासणीदरम्यान एका महिला प्रवाशाचा टीटीईसोबत वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Woman TTE Train Dispute Viral Video: एक्स्प्रेस ट्रेनमधील तिकीट तपासणीदरम्यान एका महिला प्रवाशाचा टीटीईसोबत वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित महिला स्वतःचे कपडे फाडताना दिसत आहे. तसेच, टीटीईने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोपही महिलेने केल्याचे सांगितले जात आहे.

तिकीट तपासणीवरून वादाला सुरुवात

व्हायरल व्हिडिओसोबत करण्यात आलेल्या दाव्यानुसार, टीटीईने संबंधित महिलेकडे प्रवासाचे तिकीट मागितले. मात्र, तिच्याकडे तिकीट नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या वेळी महिलेने पैसे देण्याचा प्रयत्न केला. तसेच, आपला भाऊ रेल्वेमध्ये कर्मचारी असल्याचेही तिने सांगितल्याचा दावा आहे.

यानंतर तिकीट तपासणीवरून दोघांमध्ये वाद वाढला. या वादाचा व्हिडिओ टीटीईने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे दिसत आहे.

भावाला फोन करून टीटीईवर गंभीर आरोप

व्हिडिओमध्ये महिला फोनवरून आपल्या भावाशी बोलताना दिसत आहे. यावेळी टीटीई आपले कपडे काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तिने केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, पोलिसांच्या 112 आपत्कालीन क्रमांकावर फोन करण्याची धमकीही तिने दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. टीटीईने महिलेचे नाव विचारल्यानंतर तिने आपले नाव राधिका तिवारी असल्याचे सांगितले.

महिलेने स्वतःचे कपडे फाडले

वाद आणखी वाढल्यानंतर महिला स्वतःचे कपडे फाडताना दिसत आहे. या वेळी ती टीटीईने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करताना दिसत आहे.

मात्र, व्हायरल व्हिडिओतील दृश्ये आणि त्यासोबत केले जाणारे दावे यांची पडताळणी केलेली नाही. त्यामुळे नेमके काय घडले, याबाबत अधिकृत तपास किंवा संबंधित व्यक्तींची बाजू समोर येणे महत्त्वाचे आहे.

रेल्वे सेवेकडून दखल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर Railway Seva या रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी असलेल्या अधिकृत एक्स अकाउंटनेही या प्रकरणाची दखल घेतली. संबंधित प्रवाशाला तातडीने कारवाईसाठी PNR क्रमांक आणि मोबाईल नंबर DM करण्यास सांगण्यात आले. तसेच, प्रवाशांनी आपली तक्रार RailMadad वर नोंदवावी किंवा तातडीच्या मदतीसाठी 139 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही Railway Seva कडून सांगण्यात आले.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मात्र, ट्रेन नेमकी कोणती होती, संबंधित महिला आणि टीटीई यांची ओळख काय आहे, तसेच या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT