पुढारी ऑनलाईन डेस्क : शौचास जाण्याच्या बहाण्याने पतीला जंगलात नेऊन प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह त्यांनी विहिरीत फेकून दिला. ही घटना राजस्थानच्या करौली जिल्ह्यात घडली. देवी सहाय (वय ६०) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी, तिच्या प्रियकरासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. या घटनेनंतर पत्नीने कुणालाही संशय येऊ नये म्हणून पोलिस ठाण्यात धाव घेत पती हारविल्याची खोटी तक्रार दाखल केली.
करौली जिल्ह्यातील मुदिया गावातील रहिवासी असलेला देवी सहाय याला त्याची पत्नी कुसुम हिने २० ऑगस्टला रात्री शौचास जाण्याच्या बहाण्याने घरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात नेले. त्या ठिकाणी तिचा प्रियकर पिंटू आपल्या साथिदारांसह तळ ठोकून होता. त्यानंतर देवी सहायचे अपहरण करून पिंटू आणि कुसुमने त्याचा गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्यांनी त्याचा मृतदेह भिडवली गावातील एका विहिरीत फेकून दिला. याबाबत कोणालाही संशय येऊ नये, म्हणून कुसुमने पोलिस ठाण्यात धाव घेत पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. यादरम्यान पोलिसांना कुसुमचा संशय आल्याने पोलिसांनी तिला बोलावून घेत तिची कसून चौकशी केली. त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवून तिची उलटतपासणी केली असता तिने आपणच प्रियकराच्या मदतीने तिचा खून केल्याची कबूली दिली. कुसुमने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार पोलिसांसह एसडीआरएफ टीमने विहीरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर कुसुम, पिंटूसह त्याच्या साथीदारांना अटक केली.