तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचा कोलाथूर मतदारसंघातून टीव्हीके (TVK) पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी पराभव केला आहे. Pudhari
राष्ट्रीय

Tamil Nadu Election Results 2026 |कोलाथूरमध्ये मोठा उलटफेर! मुख्यमंत्री स्टालिन यांचा पराभव करणारे TVK चे व्ही. एस. बाबू कोण?

Tamil Nadu Election Results 2026 |द्रमुकमध्ये असताना प्रथम मिळाली होती आमदार होण्याची संधी

पुढारी वृत्तसेवा

Tamil Nadu Election Results 2026

चेन्‍नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचा विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे. कोलाथूर मतदारसंघातून टीव्हीके (TVK) पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी त्यांना धूळ चारली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, मतमोजणीच्या सहाव्या फेरीपासूनच व्ही. एस. बाबू यांनी मुख्यमंत्री स्टालिन यांच्यावर आघाडी घेतली होती. त्यानंतर बाबू यांनी आपली ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली.

किती मतांच्या फरकाने झाला स्टालिन यांचा पराभव?

कोलाथूर मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या एम. के. स्टालिन यांना ७४,२०२ मते मिळाली आहेत. तर टीव्हीके उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी ८२,९९७ मते मिळवून ८,७९५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकावर एआयएडीएमके (AIADMK) पक्षाचे उमेदवार पी. संथाना कृष्णन राहिले असून त्यांना १८,४३० मते मिळाली आहेत.

तमिळनाडूतील राजकीय पक्षांची सद्यस्थिती

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत टीव्हीके पक्ष १०९ जागांवर आघाडीवर असून १५ जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. डीएमके (DMK) ६० जागांवर आणि एडप्पादी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएडीएमके ४५ जागांवर आघाडीवर आहे.

सत्ताधारी द्रमुकला मोठा धक्का

सत्ताधारी डीएमके पक्षासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. द्रमुक सरकारमधील सुमारे १५ कॅबिनेट मंत्री पिछाडीवर आहेत. यामध्ये मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एम. के. स्टालिन यांचा स्वतःचा पराभव देखील समाविष्ट आहे. दरम्यान, त्यांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांनी चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात सुरुवातीच्या पिछाडीनंतर आता थोड्या मतांनी आघाडी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT