West Bengal Election Re Voting pudhari
राष्ट्रीय

West Bengal Election Re Voting: पश्चिम बंगालच्या तब्बल १५ मतदार संघांवर होतंय पुन्हा मतदान... इथं नेमकं काय झालं होतं?

Anirudha Sankpal

West Bengal Election Repolling: पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर आणि मगराहाट पश्चिम विधानसभा मतदार संघातील १५ मतदान केंद्रावर पुन्हा मतदान होत आहे. या केंद्रावर आज सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यात ११ बूथ मगराहाट पश्चिम तर ४ बूथ हे डायमंड हार्बर मतदार संघातील आहेत. भाजपने या मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबत छेडछाड झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने इथं पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला.

फलतामध्येही होणार पुन्हा मतदान?

भाजपने आरोप केला होता की फलता भागात एका मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये कमळाच्या चिन्हासमोरच्या बटणावर टेप लावला होता. याचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर याविषयी मतदारांनी आणि राजकीय पक्षांनी तक्रार देखील दाखल केली होती. ज्यात इव्हीएममध्ये छेडछाड, बूथ कॅप्चरिंग आणि फेराफेरीचा आरोप करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फलता विधानसभा क्षेत्रातील ३० मतदान केंद्रांवर देखील पुन्हा मतदान होण्याची शक्यता आहे. यावर निवडणूक आयोगाचा निर्णय येणे अजून बाकी आहे.

आयोगाने मतदान केलं रद्द

या मतदान केंद्रांवर २९ एप्रिल रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले होते. मात्र निवडणूक आयोगाने जनप्रतिनिधित्व अधिनिमय १९५१ च्या कलम ५८(२) अंतर्गत हे मतदान रद्द केलं आहे. या कलमानुसार निवडणूक आयोगाला जर कोणत्या मतदान केंद्रावर गंभीर हेराफेरी झाली असेल किंवा ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, बूथ कॅप्चरिंग, हिंसाचार, प्रक्रियेचे उल्लंघन झाले असेल तर ते मतदान रद्द करून पुन्हा मतदान घेता येऊ शकते.

फलतामध्ये EVM मध्ये छेडछाड

पश्चिम बंगालमध्ये २९ एप्रिल रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी खूप गोंधळ आणि राजकीय वाद झाला होता. भाजपने आरोप केला होता की ईव्हीएममध्ये त्यांच्या उमेदवारासंबंधीचे बटण जाणून बुजून टेपने झाकून ठेवले होते. यामुळे त्यांचे नावच मतदारांना दिसत नव्हते. फलता मधून अभिषेक बॅनर्जी यांचे जवळचे जहांगीर खान निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपच्या नेत्यांनी याचा व्हिडिओ देखील समोर ठेवला होता. याच स्पष्टपणे भाजप उमेदावाराचे नाव टेपने झाकल्याचे दिसत होते. यानंतर निवडणूक आयोगाने इथं पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT