

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सत्तेत परिवर्तन होऊन भारतीय जनता पक्ष सत्तेवर येईल, असा अंदाज पाचपैकी चार मतदानानंतरच्या जनमत चाचण्यांत व्यक्त करण्यात आला आहे. 15 वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता हटवून भारतीय जनता पक्ष विजयी होईल, असे या सर्वेक्षणांतून दिसून येत आहे. केरळमध्ये परिवर्तनाचा ‘खेला’ होईल. काँग्रेसप्रणीत यूडीएफ सत्तेवर येईल, तर तामिळनाडूत द्रमुक सत्ता कायम राखेल. आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ‘पीपल्स पल्स’च्या सर्वेक्षणात तृणमूल 110 ते 187 जागा मिळवून सत्तेवर कायम राहील, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. यात भाजपला 95 ते 100 जागा मिळतील. तर, काँग्रेस आणि मार्क्सवादी काँग्रेससह अपक्षांना 1 ते 4 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यातआलीआहे. ‘पी. मार्क’च्या सर्वेक्षणात भाजप 150 ते 175 जागा मिळवून सत्तेवर येईल, तर तृणमूल 118 ते 138 पर्यंत जागा मिळवू शकेल. अन्य 2 ते 6 जागी विजयी होऊशकतील, असा अंदाज आहे.
‘चाणक्य स्ट्रॅटेजीस’च्या अंदाजानुसार, भाजप 150 ते 160 जागा जिंकून सत्ता मिळवेल, तर तृणमूल 130 ते 140 जागा मिळवून कडवी लढत देईल. अन्य उमेदवारांना 6 ते 10 जागा मिळतील. ‘मॅट्रिझ’च्या दाव्यानुसार, तृणमूल 125 ते 140 सदस्य निवडूनआणू शकेल. तर, भाजप 146 ते 161 जागा मिळवून सत्तेवर विराजमान होईल. अन्य 6 ते 10 जागा मिळवतील. ‘एबीपी-सी व्होटर’नुसार, भाजपला 150 ते 175 जागा, तर तृणमूलला 118 ते 138 जागा मिळतील. अन्य 2 ते 6 जागांवर विजयी होतील.
आसाममध्ये ‘पीपल्स पल्स’च्या सर्वेक्षणानुसार, भाजप 68 ते 72 जागांवर विजयी होईल. काँग्रेस 22 ते 26 जागांवर, तर तृणमूलआणिअपक्षांसह अन्य 11 ते 15 जागांवर विजयी होतील. ‘चाणक्य’नुसार, भाजप 88 ते 98, काँग्रेस 22 तर 32, तरअन्य 3 ते 5 जागा मिळवू शकतात. ‘पी. मार्क’च्या अंदाजानुसार, भाजप 65 ते 96, तर काँग्रेस 25 ते 32 आणि अन्य 6 ते 12 जागांवर विजयी होऊ शकतात.
केरळमध्ये निकाल चुरशीचे लागण्याची शक्यता असली, तरी सर्वच सर्वेक्षणांत काँग्रेसप्रणीत यूडीएफ सत्तेवर येण्याची शक्यता व्यक्त होतआहे. ‘पीपल्स पल्स’नुसार, डाव्या पक्षांची एलडीएफ 55 ते 65, तर यूडीएफ 75 ते 85जागा पटकावतील. अन्य 0 ते 3 जागा मिळवतील. ‘ॲक्सिस’नुसार, यूडीएफ 78 ते 90, तर एलडीएफ 49 ते 62 आणि अन्य 0 ते 3 जागा पटकावतील,असे मत व्यक्त केले आहे. ‘मॅट्रिझ’नुसार, एलडीएफ 60 ते 65, तर यूडीएफ 70 ते 75 आणि अन्य 5 ते 9 जागांवर विजयी होतील. ‘चाणक्य’नुसार, एलडीएफला 56 ते 64 आणि यूडीएफ 72 ते 80 जागांवर विजयी होऊ शकेल. तर, अन्य 3 ते 7 जागा मिळवू शकतील.
तामिळनाडूत द्रमुक आघाडीचा विजय मोठ्या फरकाने होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला सोबत घेणाऱ्या अण्णा द्रमुकचा पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यातआली आहे. ‘पीपल्स पल्स’नुसार, द्रमुक 125 ते 145 जागा, अण्णा द्रमुक 65 ते 80 जागा पदरात पाडून घेऊ शकेल. अभिनेता विजयच्या पक्षासह अन्य 20 ते 30 जागांवर विजयी होतील. ‘मॅट्रिझ’च्या अंदाजानुसार, द्रमुक 122 ते 132, अण्णा द्रमुक 87 ते 110 आणिअन्य 10 ते 18, तर ‘चाणक्य स्ट्रॅटेजीस’नुसार द्रमुक 145 ते 160, अण्णा द्रमुक 50 ते 65 आणि अन्य 18 ते 26 जागांवर विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बहुतांश ‘एक्झिट पोल’नुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेचा सोपान चढेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितशहा यांनी केलेला आक्रमक प्रचार, केंद्रीय सुरक्षा दलांच्या तैनातीमुळे गुंडगिरीला बसलेला चाप आणि ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षांच्या सत्ताकाळामुळे निर्माण झालेली ॲन्टी इन्कम्बन्सी यामुळे परिवर्तन पाहायला मिळेल, असे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करतआहेत.