West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये गुरूवारी सायंकाळी पुन्हा राजकीय गोंधळ निर्माण झाला. टीएमसी नेत्यांनी स्ट्राँग रूममध्ये गडबड झाल्याचा आरोप करत आंदोलन केलं. सायंकाळी भाजप कार्यकर्ते देखील स्ट्राँग रूममध्ये पोहचले. यानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठी बाचाबाची झाली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांना समजवून शांत केलं.
टीएमसीने एक सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केलं. त्यात दावा केला गेला की कोलकात्याच्या नेताजी इंडोअर स्ट्रेडियममध्ये असलेल्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या बॅलेट बॉक्ससोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेलाय. यावरून टीएमसीचे दिग्गज नेते डॉक्टर शशी पांजा आणि कुणाल घोष यांनी स्टेडियमबाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केले.
एवढंच नाही तर मुख्यमंत्री ममजा बॅर्जी देखील स्वतः सखावत मेमोरियल स्कूलमधील स्ट्राँग रूममध्ये पोहचल्या. त्या अनेक तास आत होत्या. यानंतर भाजप कार्यकर्ते देखील स्ट्राँग रूमच्या बाहेर थांबून होते. त्यांनी देखील जोपर्यंत ममता बॅनर्जी यांना हटवले जात नाही तोपर्यंत ते देखील मागे हटणार नाहीत असा पवित्रा त्यांनी घेतला. यामुळं वातावरण तणावपूर्ण झालं. दरम्यान, निवडणूक आयोगाने सर्व आरोप फेटाळले आहे.
टीएमसीने आरोप केला की भाजप आणि निवडणूक आयोग मिळून लोकशाहीचा खेळ मांडला आहे. पक्षाने त्यांना कोणतीही माहिती न देता स्ट्राँग रूमच्या आसपास हालचाल होत आहे. ही गोष्ट चुकीची आहे. फक्त कोलकातामध्येच नाही तर दुर्गापूरमध्ये देखील वातावरण तंग झालं आहे. इथं स्ट्राँग रूमच्या अगदी २०० मीटर जवळ टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. कडक ऊन आणि उष्णता असूनही जवळपास १०० कार्यकर्ते दिवस रात्र शिफ्ट लावून तिथं कडा पहारा देत आहेत.