Vijay Thalapathy TVK PUDHARI
राष्ट्रीय

Vijay Thalapathy TVK: विजय थलापतीच्या TVK चा नेमका अर्थ काय; सॉफ्ट हिंदूत्व की सेक्युलरिजम... पक्षाचं धोरण काय?

Anirudha Sankpal

Vijay Thalapathy TVK Political Ideology: तमिळ नाडू विधानसभा निवडणूक २०२६ चा मोठा उलटफेर करणारा निकाल लागला आहे. तमिळनाडूत फक्त सत्तांतर होण्याची शक्यता नाही तर गेली अनेक दशके सुरू असलेला राजकीय DMK आणि AIADMK चा ट्रेंड उद्ध्वस्त होताना दिसत आहे.

अभिनेता विजय थलपतीच्या अवघ्या आठ महिन्याचा TVK पक्ष सत्ताधारी डीएमके पक्षाचे पानीपत करतोय असं चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे. नुकत्याच हाती आलेल्या कलानुसार विजय थलापतीचा पक्ष TVK हा जवळपास १०० जागांवर आघाडीवर आहे तर सत्ताधारी डीएमके हा तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. तमिळनाडूत एकूण २३४ जागांपैकी बहूमतासाठी ११८ जागा जिंकणे गरजेचे आहे. दरम्यान, टीव्हीके हा पक्ष सध्या राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असून त्यांचाच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

काय आहे TVK चा फुल फॉर्म अन् अर्थ?

विजय थलापतीने तमिळनाडूत आता वेगळा पर्याय हवा असं म्हणत अवघ्या आठ महिन्यापूर्वी पक्ष स्थापन केला. ज्यावेळी त्यानं पक्ष स्थापन केला त्यावेळी त्याने आपल्या पक्षाचे नाव तमिलगा वेट्टरी कझगम (Tamilaga Vettri Kazhagam) असं नाव ठेवलं. तमिळनाडूमधील इतर पक्षांप्रमाणेच याचा शॉर्टफॉर्म (TVK) सर्वाधिक जास्त लोकप्रीय झाला.

तमिलगा वेट्टरी कझगम याचे इंग्रजी भाषांतर हे तमिळनाडू व्हिक्टरी फेडरेशन असा होतो. याची स्थापना अभिनेता विजय थलापतीने २ फेब्रुवारी २०२४ रोजी केली होती. हा पक्ष तमिळ नाडू आणि पाँडेचेरी या राज्यात कार्यरत आहे.

पक्षाचा झेंडा आणि चिन्ह

निवडणूक आयोगाने विजय थलापतीच्या टीव्हीकेला शिट्टी हे चिन्ह दिलं आहे. विजयने हे चिन्ह म्हणजे विजयाचं प्रतिक असल्याचं सांगितलं होतं. पक्षाच्या झेंड्याबाबत बोलायचं झालं तर झेंडा हा मरून आणि पिवळ्या रंगाच्या पट्ट्यांच्या मिश्रणातून बनला आहे. यावर दोन आक्रमक युद्ध करण्यास तयार असलेल्या दोन हत्तांचा देखील वापर करण्यात आला आहे. तसेच वागई फुल झेंड्याच्या मधोमध आहे. वागई फुल हे तमिळ संगम लिट्रेचरमधील एक ऐतिहासिक सिम्बॉल आहे. हे फुल विजय आणि कणखरपणाचे लक्षण आहे.

थलापतीच्या TVK चे काय आहे राजकीय उद्दिष्ट?

ज्यावेळी थलापती विजयने मोठा पडदा सोडून राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आम्हाला स्वच्छ, भ्रष्टाचार मुक्त राजकीय पर्याय द्यायचा आहे असं सांगितलं होतं. त्यांच्या पक्षाची राजकीय विचारसरणी ही सामाजिक न्याय, सेक्युलरिझम आणि समानता या तत्वांवर आधारित आहे. हा राजकीय पक्ष पिरापोक्कम एल्ला उयिरक्कम (जन्माने सर्वजण समान आहेत) या तत्वाचा पुरस्कार करते. काही महिन्यापूर्वी पक्षाची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून, पहिली मुख्य निवडणूक ही २०२६ मधील तमिळ नाडू मधील विधान सभेची निवडणूक आहे. या निवडणुकीतच ते सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ जाताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT