Valentine’s Week 2026:
फेब्रुवारी म्हणजेच प्रेमाचा महिना. या महिन्यातील गुलाबी थंडीमध्ये जणू प्रेम आणि रोमान्स विरघळलेला असतो. जोडप्यांसाठी हा वर्षातील सर्वात खास महिना असतो, कारण यात 'व्हॅलेंटाईन वीक' येतो. ७ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १४ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या आठवड्यात प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करत असतो. त्यामुळे आता जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीकचे कॅलेंडर आणि प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य.
७ फेब्रुवारी, शनिवार व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 'रोझ डे'ने होते. या दिवशी प्रेमीयुगल एकमेकांना गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक मानले जाते, तर पिवळा मैत्रीचे आणि पांढरा शांततेचे. नात्यात गुलाबाचे रंग आणि सुगंध भरण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
८ फेब्रुवारी, रविवार हा दिवस नवीन प्रेमींसाठी खूप खास असतो. जर तुम्हाला कोणी आवडत असेल आणि तुम्हाला त्याच्यासमोर मनातील बोलायचं असेल, तर हा दिवस सर्वोत्तम आहे. प्रपोज डेच्या दिवशी लोक आपल्या खास व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करतात.
९ फेब्रुवारी, सोमवार प्रेम व्यक्त केल्यानंतर आता वेळ आहे नात्यात गोडवा आणण्याची. सोमवारी लोक एकमेकांना त्यांच्या आवडीचे चॉकलेट भेट देतात. चॉकलेट मूड बदलण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी ओळखले जाते, जे नात्यातील कटुता दूर करून प्रेम वाढवते.
१० फेब्रुवारी, मंगळवार टेडी हे निरागसता आणि कोमलतेचे प्रतीक आहे. या दिवशी जोडीदार एकमेकांना गोंडस टेडी गिफ्ट करतात. ही भेट या गोष्टीची जाणीव करून देते की, तुम्ही जवळ नसतानाही तुमच्या आठवणींची उब आणि निरागसता त्यांच्यासोबत राहावी.
११ फेब्रुवारी, बुधवार फक्त भेटवस्तू पुरेशा नसतात, नाते टिकवण्यासाठी वचनंही महत्त्वाची असतात. प्रॉमिस डेच्या दिवशी एकमेकांना खरे प्रेम, प्रामाणिकपणा आणि प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे राहण्याचे वचन देतात. हा दिवस नात्याचा पाया मजबूत करण्याचे प्रतीक आहे.
१२ फेब्रुवारी, गुरुवार एक 'जादूची झप्पी' म्हणजेच मिठी मारणे, न बोलताही बरेच काही सांगून जाते. हा दिवस एकमेकांना मिठी मारून आपल्या प्रेमाची जाणीव करून देण्याचा आहे. एकमेकांना मिठी मारल्याने केवळ दुरावा कमी होत नाही, तर जोडीदाराला आपण सुरक्षित आहोत याची जाणीव होते.
१३ फेब्रुवारी, शुक्रवार व्हॅलेंटाईन डेच्या बरोबर एक दिवस आधी किस डे साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करण्याचा हा एक अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक मार्ग आहे. हा दिवस शारीरिक आणि मानसिक जवळीकीसोबतच अतूट प्रेम आणि सन्मान देखील व्यक्त करतो.
१४ फेब्रुवारी, शनिवार व्हॅलेंटाईन वीकच्या शेवटच्या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा हा दिवस प्रेमाच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी लोक डेटवर जातात, एकमेकांना सरप्राइज देतात आणि आपल्या जोडीदारासोबत खूप चांगला वेळ घालवतात.