Relationship: १०० प्रयत्न केले तरी 'एक्स'ची आठवण का येते? मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

ब्रेकअप होऊन बराच काळ लोटला तरी अनेकांना आपल्या 'एक्स' जोडीदाराची आठवण येत राहते. १०० प्रयत्न करूनही मन भूतकाळातच अडकलेलं असतं. यामागे काही ठोस मानसिक कारणं आहेत.

नात्यात असताना निर्माण झालेली भावनिक ओढ खूप खोलवर असते. एकत्र पाहिलेली स्वप्नं आणि घालवलेला वेळ मेंदूवर असा ठसा उमटवतो, जो पुसणे सोपे नसते.

सोशल मीडियावर जुने फोटो पाहणे किंवा जुने चॅट्स वाचणे ही सवय घातक ठरते. यामुळे मेंदूला वारंवार त्याच जुन्या नात्याकडे ओढले जाते आणि जखम ताजी राहते.

अनेकदा नाते अचानक संपते. "असं का झालं?" या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नसतं. हे अपूर्ण प्रश्न मनाला पुढे जाऊ देत नाहीत आणि व्यक्ती तिथेच अडकून पडते.

आता मला समजून घेणारं कोणी मिळेल का? ही भीती सर्वात मोठी असते. याच भीतीमुळे माणूस नवीन सुरुवात करण्याऐवजी जुन्याच आठवणींना घट्ट धरून ठेवतो.

रोज बोलणं, मेसेज करणं ही एक सवय झालेली असते. ब्रेकअपनंतर जेव्हा हे चक्र थांबतं, तेव्हा मेंदूला एक प्रकारचा 'शॉक' बसतो. तो रिकामेपणा भरून काढण्यासाठी मन पुन्हा 'एक्स'कडे वळतं.

जर नातं फसवणुकीमुळे तुटलं असेल, तर माणूस स्वतःमध्येच उणिवा शोधू लागतो. स्वतःच्या आत्मविश्वासाला तडा गेल्यामुळे जुन्या गोष्टींचा विचार वारंवार मनात येतो.

स्वतःला वेळ द्या. जोपर्यंत तुम्ही स्वतःला 'सेल्फ-हीलिंग'साठी वेळ देत नाही, तोपर्यंत पुढे जाणं कठीण आहे. स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा.

जुन्या जोडीदाराला सोशल मीडियावर स्टॉक करणे किंवा त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे थांबवा. 'नो कॉन्टॅक्ट' रूल पाळल्याने मनाला शांतता मिळते.

भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य तुमच्या हातात आहे. स्वतःवर प्रेम करा आणि नवीन संधींसाठी तयार राहा. आयुष्य खूप सुंदर आहे!