uttar pradesh shahjahanpur fighter planes land on ganga expressway
शाहजहापूर (उत्तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन
शाहजहापूर जिल्ह्यासाठी आजचा २ मे चा दिवस हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. आजच्या दिवशी पहिल्यांदा जिल्ह्याच्या जमिनीवर लढाऊ विमाने उतरणार आहेत. जलालाबादच्या गंगा एक्स्प्रेसवर बनवण्यात आलेल्या धावपट्टीवर या विमानांचे लँडिंग होणार आहे. यावर भारतीय हवाई दल आपले शौर्य दाखवणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत राफेल व जग्वारची लँडिंग या एक्स्प्रेसवेवर होणार आहे. खास तयार करण्यात आलेल्या हवाई पट्टीवर ही विमाने उतरणार आहेत. यावेळी भव्य एअर शोचेही आयोजन करण्यात आले आहे. युद्धजन्य परिस्थिती किंवा आपत्तीच्यावेळी या हवाई पट्टीचा वैकल्पिक रनवे म्हणून वापर केला जाऊ शकतो. गंगा एक्स्प्रेस वे वरील ही देशातील पहिली अशा प्रकारची हवाई पट्टी आहे. ज्या ठिकाणी लढाऊ विमाने दिवस-रात्र लँड होऊ शकतील.
शाहजहांपूर जिल्ह्यात पहिल्यांदा दोन मे दिवशी राफेल, मिराज आणि जगुवार यासारखी लढाउ विमाने उतरतील. योगी आदित्यनथ यांच्या शेकडो अधिकारी, लोक या घटनेचे साक्षीदार होणार आहेत. नाईट लँडींग शोमुळे कटरा-जलालाबाद मार्ग २ मे च्या सायंकाळी ७ वाजल्यापासून पूर्णतहा बंद ठेवण्यात येणार आहे. याआधी २ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून वायुसेनेकडून पाहणी करण्यात येईल. सकाळी ९:४५ पासून १०:३० वाजेपर्यंत हवाई दलाची विमाने हवाई प्रात्यक्षिके दाखवतील. जलालाबादमधील पीरू गावापासून गेलेल्या धावपट्टीवर २ आणि ३ मे रोजी होणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.
बुधवारी डीएम धर्मेंद्र प्रताप सिंह आणि एसपी राजेश द्विवेदी यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. भटक्या गुरांचे व्यवस्थापन, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि शालेय मुलांसाठी बसण्याची व्यवस्था सुधारण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. धूळ उडू नये म्हणून पाणी शिंपडण्यासह इतर व्यवस्था वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
डीएम म्हणाले की, नाईट लँडिंग शोमुळे, कटरा-जलालाबाद मार्ग २ मे रोजी संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. लोक पर्यायी मार्गांचा वापर करतील. सुमारे अडीचशे कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवली जाईल. रात्रीच्या लँडिंगसाठी धावपट्टीवर प्रकाशयोजनेची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी कॅम्प ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि हवाई दलाच्या सरावाच्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीत त्यांनी शालेय मुले, एनसीसी, स्काउट गाईड आणि लोकप्रतिनिधींसाठी बसण्याची व्यवस्था, वाहन पार्किंग, पाण्याचे टँकर, मोबाईल टॉयलेट आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेवर चर्चा केली. सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य आगमनाच्या पार्श्वभूमीवर, सर्व तयारी गांभीर्याने आणि जबाबदारीने करावी.
धावपट्टीवर एक स्विस कॉटेज बांधले जात आहे आणि जवळच एक जर्मन हँगर बांधले जात आहे. मुख्यमंत्र्यांसह काही खास लोकच येथे उपस्थित राहतील. रनवेच्या कुंपणाच्या बाहेर मीडियासह इतर पासधारकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हवाई दल लँडिंगशी संबंधित विविध तांत्रिक कामे देखील पूर्ण करत आहे. मुख्यमंत्र्यांना एअर शो पाहण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्विस कॉटेज पारदर्शक करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.