Uttar Pradesh Congress Internal Rift pudhari
राष्ट्रीय

Uttar Pradesh Congress Internal Rift: पंजाब नंतर आता उत्तर प्रदेशातही काँग्रेसचे तेच रडगाणं; दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ?

Anirudha Sankpal

Uttar Pradesh Congress Internal Feud: पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षा आघाडी करून लढण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही जागा वाटापला औपचारिक स्वरूप आलेलं नाही. त्यातच काँग्रेसला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अजय राय आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी राजेंद्र पाल गौतम यांच्यात मतभेद असल्याचं समोर आलं आहे.

पंजाबनंतर आता उत्तर प्रदेश

काँग्रेस हाय कमांडने आदल्याच दिवशी पक्षात असलेले मतभेद सोडवण्यासाठी हस्तक्षेप केला होता. त्यानंतर आता या मतभेदांची गोष्ट समोर आली आहे. हाय कमांडने AICC च्या प्रभारींना देखील बदलले होते. आता २०२७ च्या सुरूवातीला पंजाब विधानसभा निवडणुका होणार आहेत.

प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाराणसीचे भूमीहार नेते अजय राय आणि प्रामुख्याने दिल्लीत सक्रीय राजकारणात असलेले राजेंद्र पाल गौतम यांची काम करण्याची पद्धत वेगवगेळी आहे. त्यामुळे या दोघांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. राय यांची ऑगस्ट २०२३ मध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. तर गौतम यांना या वर्षी जून महिन्यात AICC प्रभारी पद स्वीकारले आहे.

हाय कमांडची बैठक अन्...

AICC च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा आणि पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी गौतम यांच्यासोबत एक तास चर्चा केली. बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यात अजय राय यांच्या नेतृत्वातील प्रदेश काँग्रेसमध्ये कमिटीला प्रभावित करू शकते.

प्रियांका गांधी या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्यानंतर उत्तर प्रदेशशी निगडीत पक्षाच्या बाबींमध्ये जास्त सक्रीय झाले आहेत. त्या महत्वाच्या बैठकीत भाग घेत आहेत. प्रदेश काँग्रेसच्या काही नेत्यांना चिंता आहे की अजय राय आणि राजेंद्र पाल गौतम यांच्यातील वाढता मतभेद पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत पक्षाला सेटबॅक देऊ शकतो.

कुठं ठिणगी पडली?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गौतम यांनी कथितरित्या उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बदलण्याचा मुद्दा उचलला त्यानंतर अजय राय आणि राजेंद्र पाल गौतम यांच्यात मतभेद वाढले. राजय गौतम यांच्यावर नाराज झाले. गौतम यांच्या मतानुसार काँग्रेसची दलित - मुस्लिम सामाजिक समिकरण बसवण्याच्या रणनितीनुसार प्रदेश अध्यक्ष पदावर मुस्लिम नेता ठेवणं जास्त फायदेशीर ठरेल. गौतम यांनी जौनपूरचे माजी आमदार नदीम जावेद यांचे नाव सुचवले आहे.

काँग्रेस खासदाराने गौतम यांना मुस्लिम नेत्याला प्रदेश अध्यक्ष करण्यामागे स्पष्ट विचार आहेत. जर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी दलित आहेत तर प्रदेश अध्यक्ष हे मुस्लिम असले तरी जागा वाटपात समाजवादी पार्टीवर जास्त दबाव टाकता येईल. एसपी मुस्लिम मतांवर जास्त अवलंबून आहे.

उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की अजय राय यांचे राजकारण हे मंदिर आणि सवर्ण समुदायांच्या अवती भोवती केंद्रित आहे. तर गौतम हे कट्टर अंबेडकरवादी आहेत. ते राजकारणात धर्म आणण्याबाबत फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळं या दोघांमध्ये मतभेद होणे सहाजिक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT