Udaipur Foreign YouTuber Viral Video Pudhari
राष्ट्रीय

Viral Video: थायलंड युट्यूबर लाइव्ह होती, अचानक तरुण जवळ आला अन् केली विचित्र मागणी; पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का

Udaipur Foreign YouTuber Viral Video: राजस्थानमधील उदयपूर येथे लाइव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या जस्टकेथ या परदेशी युट्यूबरसोबत एका तरुणाने विचित्र वर्तन केले.

Rahul Shelke

Udaipur Foreign YouTuber Viral Video: राजस्थानमधील उदयपूर हे शहर पर्यटनस्थळांसाठी ओळखले जाते. देश-विदेशातून हजारो पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. मात्र, याच उदयपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने परदेशी महिला युट्यूबरसोबत केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

ही घटना थायलंड आणि फ्रान्सशी संबंधित असलेल्या जस्टकेथ (JustKeeth) या युट्यूबरसोबत घडली. ती रात्रीच्या वेळी उदयपूरमधील एका गजबजलेल्या ठिकाणी लाइव्ह स्ट्रीमिंग करत होती. यावेळी अनेक लोक तिच्याकडे पाहत होते. ती आपल्या ऑनलाइन चाहत्यांशी संवाद साधत असतानाच एक तरुण तिच्याजवळ आला.

मात्र, या तरुणाने तिच्याकडे फोटो किंवा सेल्फीची मागणी केली नाही. त्याऐवजी त्याने थेट किस करण्याची विचित्र मागणी केली. तरुणाच्या या वागण्यामुळे युट्यूबर अस्वस्थ झाली. तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला. आपल्याला अशा प्रकारची गोष्ट आवडत नसल्याचेही तिने सांगितले.

मात्र, तिचा नकार ऐकूनही तरुण थांबला नाही. तो वारंवार तीच मागणी करत राहिला. व्हायरल व्हिडिओमध्ये युट्यूबरच्या चेहऱ्यावरचा अस्वस्थपणा स्पष्टपणे दिसत आहे.

काही वेळानंतर तरुणाने आपली मागणी बदलली आणि तिच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. यावर युट्यूबरने अस्वस्थ असूनही फोटो काढण्यास होकार दिला. त्यानंतर तरुणाने जाताना तिच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला.

युट्यूबरने स्वतः शेअर केला व्हिडिओ

या घटनेनंतर जस्टकेथने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. त्यासोबत तिने 'किमान त्याने विचारलं तरी' अशा आशयाची टिप्पणी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, त्याला ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तरुणाच्या वर्तनावर जोरदार टीका केली आहे. एखाद्या व्यक्तीने स्पष्टपणे नकार दिल्यानंतरही वारंवार तीच मागणी करणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. कोणत्याही व्यक्तीच्या इच्छेचा आणि निर्णयाचा आदर केला पाहिजे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

काहींनी तरुणाच्या वर्तनामुळे परदेशी पर्यटकांसमोर भारताची प्रतिमा खराब होत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी अशा घटनांमुळे महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT