Black Panther Viral Video file photo
राष्ट्रीय

Black Panther Viral Video: जंगलात पहिल्यांदाच एकत्र दिसले दोन ब्लॅक पँथर; असा व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल!

भारतातील जंगलात एक अद्भूत आणि दुर्मिळ दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. येथे एक नाही, तर दोन ब्लॅक पँथर एकत्र फिरताना दिसले आहेत. असे दृश्य दिसणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

मोहन कारंडे

Black Panther Viral Video

बंगाल: बिबट्याबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल आणि कदाचित पाहिलाही असेल. मानवी वस्तीच्या आसपास सर्वात जास्त दिसणारा हाच तो शिकारी प्राणी आहे. पण तुम्ही कधी काळा बिबट्या म्हणजेच 'ब्लॅक पँथर' पाहिला आहे का? बंगालच्या जंगलात एक अद्भूत आणि दुर्मिळ दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. येथे एक नाही, तर दोन ब्लॅक पँथर एकत्र फिरताना दिसले आहेत. असे दृश्य दिसणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी या दुर्मिळ दृश्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ उत्तर बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात येणाऱ्या कर्सियांग वनविभागातील आहे.

सहसा ब्लॅक पँथरला सामान्य बिबट्यांसोबत फिरताना पाहिले जाते. परंतु, दोन ब्लॅक पँथर्सचे एकत्र फिरणे ही खूप मोठी बाब आहे. त्यांची संख्या अत्यंत कमी आहे, त्यातच शिकार आणि कमी होत जाणारी जंगले यामुळे त्यांच्या अधिवासावर संकट ओढवले आहे. जंगलातील प्राण्यांच्या हालचालींवर आणि त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी २० पेक्षा जास्त कॅमेरे लावण्यात आले आहेत, त्यापैकीच एका कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झाले आहे.

बिबट्याच अशा दोन्ही पिल्लांना जन्म देतो!

आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, "ब्लॅक पँथर हा मुळात एक बिबट्याच आहे, परंतु तो त्याचा 'मेलानिस्टिक' प्रकार आहे." जनुकीय बदलामुळे हे प्राणी काळे दिसतात, यालाच 'मेलानिझम' असे म्हणतात. यामुळे शरीरात गडद रंगाचे रंगद्रव्य खूप वाढते, ज्यामुळे बिबट्या काळा दिसू लागतो. जर तुम्ही त्यांना उजेडात पाहिले, तर त्यांच्या शरीरावर सामान्य बिबट्याप्रमाणेच ठिपके दिसून येतात. एक सामान्य मादी बिबट्या ब्लॅक पँथर आणि सामान्य बिबट्या अशा दोन्ही पिल्लांना जन्म देऊ शकते.

काबिनीच्या जंगलातील प्रसिद्ध 'साया'

कर्नाटकच्या काबिनी नॅशनल वाइल्डलाइफ सँक्चुअरीमध्ये 'साया' नावाचा दुर्मिळ ब्लॅक पँथर खूप प्रसिद्ध आहे. हा बिबट्या निर्भयपणे जंगलात एकटा फिरताना दिसतो. सहसा ब्लॅक पँथर माणसांपासून लांब राहतात, पण 'साया'ला पर्यटकांसमोर येण्यास कोणतीही अडचण नसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT