

Cricket Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल. ९ कोटी लोकांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे. झुबेर नावाच्या एका युजरने व्हिडिओत सांगितले की, तो फास्ट बॉलरला 'मारण्याची' खास ट्रिक सांगणार आहे.
कल्पना करा... सोशल मीडियावर तुम्हाला एखादा व्हिडिओ दिसला, ज्यामध्ये क्रिकेट खेळताना एक व्यक्ती म्हणतेय की, "आज आम्ही तुम्हाला फास्ट बॉलरला मारण्याची पद्धत सांगणार आहोत?" अशा वेळी कोणताही सामान्य माणूस किंवा क्रिकेट प्रेमी असाच विचार करेल की, हा माणूस फास्ट बॉलरच्या विरुद्ध फलंदाजी करण्याची काहीतरी खास युक्ती सांगणार आहे. पण जेव्हा झुबेर नावाच्या यूजरने ९ जानेवारी रोजी असाच एक व्हिडिओ बनवून इंटरनेटवर टाकला, तेव्हा त्या व्हिडिओने इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमलाच हादरवून सोडले.
व्हिडिओमध्ये एक कॅमेरामन आहे, एक फलंदाज आहे आणि एक गोलंदाज आहे. एका रिकाम्या मैदानात दोन जण क्रिकेटचे 'गुपित' सांगण्यासाठी बाहेर पडतात. फलंदाज हातात बॅट धरून गोलंदाजाच्या चेंडूची वाट पाहत असतो. तेवढ्यात तो कॅमेऱ्याकडे बघून म्हणतो "आज आम्ही सांगणार आहोत की फास्ट बॉलरला कसं मारायचं..." अनेक लोक या उत्तराची वाट पाहत असतात. पण जसा गोलंदाज चेंडू फेकतो, तशीच फलंदाजाच्या हातातील बॅट निसटते आणि थेट गोलंदाजाच्या दिशेने जाते! हे पाहून लोकांचे हसू थांबत नाही. कारण बॅट चेंडूला स्पर्शही करत नाही, पण ती बॅट गोलंदाजाला नक्कीच लागली असेल, असा अंदाज लावला जात आहे.
हा काही सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जरी यामध्ये फास्ट बॉलरला खेळण्याची पद्धत सांगितली नसली, तरी त्याने जे काही केले त्यामुळे हसायला नक्की येते.