

Engineering College Hostel Private Video Leaked Friend
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात मैत्रिणीनेच मैत्रिणीचा विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका तरुणीने आपल्या सोबत राहणाऱ्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे खासगी व्हिडिओ चोरून शूट केले आणि ते आपल्या प्रियकराला पाठवले.
पीडित तरुणी आणि आरोपी तरुणी या दोन्ही अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असून गेल्या तीन वर्षांपासून वस्तीगृहातील एकाच खोलीत राहत होत्या. १९ जानेवारी रोजी रात्री आरोपी तरुणी तिच्या प्रियकराशी फोनवर संवाद साधत असताना ही बाब उघड झाली. ती आपल्या प्रियकराला विचारत होती की, "फोटो आणि व्हिडिओ कसे वाटले? ते चांगले आहेत का?" हे ऐकून पीडित तरुणीला संशय आला आणि तिने आरोपीचा मोबाईल घेऊन तपासला असता, तिला त्यात स्वतःचे खासगी व्हिडिओ आणि फोटो आढळले.
याप्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर सिडको पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज भालगडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.