नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले Twitter इंडियाचे सीईओ मनीष माहेश्वरी यांना भारतातून हटविण्यात आले आहे. ते आता अमेरिकेत कंपनीची जबाबदारी सांभाळणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून सत्ताधारी आणि ट्विटर असा संघर्ष पहायला मिळाला.
तर गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांचे अकाउंटवर बंदी घालण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू होते.
या गदारोळात मनीष हेश्वरी यांची बदली झाली आहे.
मनीष माहेश्वरी आता सॅन फ्रॅन्सिस्को येथे रेव्हेन्यू आणि स्ट्रॅटेजी विभागाचे सीनिअर डायरेक्टर म्हणून काम पाहणार आहेत.
हे पद नव्या मार्केट पॉलिसीभोवती केंद्रीय आहे. दोन महिला सांभाळणार भारताची जबाबदारी
मनीष माहेश्वरी यांची बदली झाल्यानंतर आता टि्वटर इंडियाची जबाबदारी कोण सांभाळणार याकडे लक्ष लागले होते.
कंपनीने याबाबत एक ईमेल केला असून त्यात म्हटले आहे,
विद्यमान सेल्स हेड कनिका मित्तल आणि विद्यमान बिजनेस हेड नेहा शर्मा या दोन अधिकाऱ्यांवर ट्विटर इंडियाची जबाबदारी असेल.
या दोघीी जपानच्या व्हाईस प्रेसिडेंट सासामोटो यांना रिपोर्टिंग करतील.
२१ जून रोजी मनीष माहेश्वरी यांच्याविरोधात गाजियाबाद पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीआरपीसीच्या कलम ४१-ए नुसार हा गुन्हा दाखल केला होता. यात ट्विटरच्या एका यूजरने सामाजिकदृष्ट्या संवेदनशील व्हिडिओ अपलोड केला होता. त्याप्रकरणी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.
माहेश्वरी यांनी गुरुवारी कर्नाटक हायकोर्टात सांगितले होते की, ट्विटर इंडिया ही एक स्वतंत्र संस्था आहे. याची मूळ कंपनी ट्विटर आयएनसी चा कोणताही हिस्सा यात नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांची ट्विटर अकाउंट लॉक करण्यात आली आहेत. या कारवाईविरोधात राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्विटरचे धोरण पक्षपाती आहे. ही कारवाई म्हणजे लोकशाही विरोधातील हल्ला आहे. माझे समर्थन करणार्या लाखो नागरिकांचा अपमान झाला आहे. दरम्यान, काँग्रेसने दावा केला आहे की, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसह ५ हजार ट्विटर अकाउंट लॉक करण्यात आली आहेत.
पहा व्हिडिओ: