Rahul Gandhi On Parliament Monsoon Session
भाषणातील मुद्दे संसदीय रेकर्डमधून वगळल्याप्रकरणी राहुल यांची प्रतिक्रिया File Photo
राष्ट्रीय

Parliament Monsoon Session|सत्य हे सत्यच असते! राहुल गांधी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (दि.१ जून) संसद सभागृहात अभिभाषण केले. त्यांच्या भाषणातील काही भाग विधाने संसद सभागृहाच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आली. यावर यावर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज (दि.२ जून) संसद परिसरात माध्यमांशी संवाद सांधला.

'सत्य हे सत्यच असते' ते काढून टाकता येत नाही; राहुल गांधी

राहुल गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मोदीजींच्या जगात, सत्य काढून टाकले जाऊ शकते. परंतु प्रत्यक्षात, सत्य काढून टाकले जाऊ शकत नाही. मला जे सांगायचे होते ते मी बोललो, ते सत्य आहे. ते त्यांना पाहिजे तितके काढून टाकू शकतात. सत्य हे सत्य असते."

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस

राष्ट्रपतींच्या भाषणावरील भाजप खासदार अनुराग ठाकूर का (दि.१ जुलै) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मांडला. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेला संबोधित केले. दरम्यान त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर आरोप करत, जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे संसद सभागृहाच्या रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आले आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. संसदीय कामकाजाला सुरूवात झाली असून, संसद सदस्यांची भाषणे सुरू आहेत.

हा 'इंडिया' आघाडीचा नैतिक विजय; सपा प्रमुख अखिलेश यादव

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव धन्यवाद प्रस्ताव मांडला. यावेळी ते म्हणाले, “लोक म्हणत आहेत की हे सरकार चालणार नाही. लोकसभा निवडणुकीत हा 'इंडिया' आघाडीचा नैतिक विजय होता. हा सकारात्मक राजकारणाचा विजय होता, असेही जनता म्हणत आहे.

SCROLL FOR NEXT