त्रिपुरामध्ये पिकनिक बसला आग Pudhari Photo
राष्ट्रीय

Tripura Bus Fire Accident : त्रिपुरामध्ये पिकनिक बसला आग; 13 विद्यार्थी जखमी

बसमध्ये ठेवलेल्या जनरेटरचा स्फोट झाल्याने अपघात

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम त्रिपुरातील मोहनपूर येथे सोमवारी (दि.6) पिकनिकर्स घेऊन जाणाऱ्या बसला आग लागून 13 शालेय विद्यार्थी भाजले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पश्चिम त्रिपुराचे पोलीस अधीक्षक (एसपी) किरण कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, त्यापैकी 9 जणांना येथील जीबीपी रुग्णालयात पाठविण्यात आले आणि उर्वरित चार जणांना स्थानिक आरोग्य सुविधेत उपचारानंतर सोडण्यात आले. अशा आशयाचे वृत्त वृत्तसंस्था 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.

गाडीतील जनरेटर फुटल्याने अपघात

पिकनिकला गेलेल्या या अपघातग्रस्त गाडीच्या आत ठेवलेल्या जनरेटरमध्ये झालेल्या स्फोटामुळे बसला आग लागली, असे त्यांनी सांगितले. पोलिसांचा तपास चालू आहे. मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि सर्व जखमी विद्यार्थी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली

मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवर लिहिले की, “मोहनपूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल अत्यंत चिंतित, जेथे जनरेटरच्या स्फोटानंतर पिकनिक बसला आग लागली. या दुःखद घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी मी प्रार्थना करतो. साहा म्हणाले की, जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ते म्हणाले, पिकनिकचा आनंद लुटताना मी प्रत्येकाने सतर्क आणि सावध राहण्याचे आवाहन करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT