कोल्हापूर : आराम बसला आग; एकाचा होरपळून मृत्यू

महामार्गावर मयूर पेट्रोल पंपानजीक दुर्घटना; सहा प्रवासी बचावले
fire broke out on the highway near Mayur Petrol Pump
गोकुळ शिरगाव : पुणे-बंगळूर महामार्गावर गोकुळ शिरगावजवळ शुक्रवारी रात्री खासगी आराम बसला आग लागली. आगीत भस्मसात झालेली बस. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : बेळगावहून पुण्याला निघालेली खासगी ट्रॅव्हल्सची बस जळून खाक झाली. यामध्ये एका प्रवाशाचा जळून मृत्यू झाला. पुणे-बंगळूर महामार्गावर गोकुळ शिरगाव ते उजळाईवाडीदरम्यान शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास हा ‘बर्निंग बस’चा थरार घडला. या भीषण दुर्घटनेत एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य सहा प्रवासी सुदैवाने बचावले. आग लागताच बसचालक व सहायक घटनास्थळावरून पसार झाले.

गोकुळ शिरगाव येथे बस येताच अचानक इंजिनने पेट घेतला. इंजिनला आग लागल्याचे पाहताच चालक आणि सहायकाने घटनास्थळावरून पलायन केले. बसमधील प्रवासी गडबडीने खाली उतरले. मात्र, एक प्रवासी झोपेत असल्याने बसमध्येच अडकल्याने त्याचा होरपळून मृत्यू झाला. काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. कोल्हापूर मनपाच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news