अमरावती : अकोला येथून आलेल्या शिवशाही बसला आग

Amaravati Accident News |२० प्रवाशांची सुखरूप सुटका
Amaravati Accident News |
अमरावतीत शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली.file photo
Published on
Updated on

अमरावती : अकोला येथून अमरावतीला आलेल्या शिवशाही बसचा टायर फुटल्यामुळे बसला अचानक आग लागली. ही घटना बडनेरा पोलीस स्टेशन समोर शुक्रवारी (दि.११) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता.

चालकाचे प्रसंगावधान

महापालिकेच्या अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बसमधील २० प्रवाशांनाही सुखरूप बाहेर काढल्यामुळे या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी अकोला येथून एम एच ०६ बी डब्ल्यू ०९०३ क्रमांकाची शिवशाही बस अमरावतीकडे येण्यासाठी निघाली होती. ही बस बडनेरा पोलीस ठाण्याच्या समोर आली असता बसचा मागील टायर अचानक फुटला. त्यामुळे मोठा आवाजही झाला. या घटनेत बसचे संतुलन बिघडल्यावरही चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविली. सर्व प्रवाशांना बस खाली उतरविण्यात आले.

सुदैवाने कुठलीच जीवित हानी नाही

प्रवासी उतरत असतानाच बसच्या एका बाजूला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. बडनेरा पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक अनियंत्रित झाली होती. पोलिसांनी वाहतूक नियंत्रित करत बसमधील वीस प्रवाशांनाही सुखरूप बाजूला केले. या घटनेत सुदैवाने कुठलीच जीवित हानी झाली नाही. मात्र बसचा काही भाग जळालेला आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली होती. वेळीच आग आटोक्यात आणली गेली नसती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news