TMC Crisis West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या हातून सत्ता जाताच पक्षाची वाताहात सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेसचा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत आहे. आधी आमदारांचा गट फुटला आता पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी ममता बॅनर्जींपासून वेगळी चूल मांडली आहे. या खासदारांच्या गटाने एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
ममता बॅनर्जी यांना हा मोठा झटका मानला जात आहे. यापूर्वी पश्चिम बंगाल विधानसभेत टीएमसी आमदारांच्या गाटवरील नियंत्रण ममता बॅनर्जींनी गमावलं आहे. आता काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटाने २० खासदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. यातील १४ खासदार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या घराज सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत बैठकीत सामील झाले होते. दुसरीकडं ममतांच्या जवळच्या लोकांनी बंडखोर खासदारांची संख्या ही १२ असल्याचं सांगितलं आहे.
ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्य दोन नाही तर तीन गट असल्याचं सध्याच्या घडीला दिसत आहे. टीएमसी खासदारांचा एक गट लोकसभा खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्या सोबत आहे. तर दुसरा गट अजूनही ममता बॅनर्जी यांच्यासोबत उभा आहे. हे दोन गट सोडून तिसरा देखील एक गट आहे जो सध्या सायलेंट मोडवर आहे. या गटाने बंडखोर आणि ममता या दोन्ही गटापासून स्वतःला वेगळं केलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे एकून २८ खासदार आहेत. काकोली घोष यांनी दावा केला आहे की त्यांच्यासोबत लोकसभेचे २० खासदार आहे. त्यांनी स्पीकर ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत आमच्या गटाची वेगळी व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. टीएमसीच्या बंडखोर खासदारांनी एनडीएमध्ये सामील होण्याची इच्छा दाखवली आहे.
काकोली घोष यांच्या सोबत टीएमसी जे खासदार आहेत त्यांची संख्या २० असल्याचा दावा केला जातोय. मात्र त्यातील फक्त १४ खासदारांची नावे समोर आली आहेत. या गटात काकोली घोष यांच्यासह शताब्दी रॉय, बापी हलदर, अरूप चक्रवर्ती, चून मालिया, दीपक अधिकारी (देव), कालीपदा सरेन, जगदीश बसुनिया, असित मल, अबू ताहीर खान, खलीकुर रहमान, शर्मिला सरकार, प्रसून बॅनर्जी आणि पार्थ भौमिक यांचा समावेश आहे.
टीएमसीमधील फूटीनंतरीही पक्षातील काही खासदार हे ममता बॅनर्जी यांच्या सोबत आहेत. यात अभिषेक बॅनर्जी, सयानी घोष, किर्ती आझाद, महुआ मोईत्रा, सौगत रॉय, सुदीप बंद्योपाध्याय आणि कल्याण बॅनर्जी यांचा समावेश आहे. काकोली घोष यांनी या सर्व खासदारांचे नाव घेत हा टीएमसीच्या बंडखोर गटाचा भाग नाहीयेत असं सांगितलं आहे. याचा अर्थ हे सर्व खासदार ममतांच्या सोबत आहेत. काकोली घोष आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबत कोण आहे यांची नावे समोर आली आहे.
काकोली घोष यांच्यासोबत जे खासदार आहेत त्यांनी आधी भाजप नेता भूपेंद्र यादव यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर ते सायंकाळी शताब्दी राय यांच्या घरी झालेल्या बैठकीत देखील हजेरी लावली होती. या दोन्ही ठिकाणी टीएमसीचे १४ खासदार सामील झाले होते.
टीएमसीच्या बंडखोरीदरम्यान पक्षाचे अनेक खासदार सायलेंट मोडवर आहेत. ते ना बंडखोर गटासोबत आहेत ना ममता बॅनर्जी यांच्यासोबत आहेत. यामध्ये सजदा अहमद, रचना बॅनर्जी. प्रतिमा मोंडल, माला रॉय, मिताली बेग, शत्रुघ्न सिन्हा आणि युसूफ पठाण यांचा समावेश आहे. ते पक्षाच्या बाजूने उभे असल्याचे दिसत नाहीये. या नेत्यांनी कोणतं वक्तव्य देखील केलेलं नाही. हाच सायलेंट गट बंगालच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणण्याची शक्यता आहे.
पक्ष बदल विरोधी कायद्यातील तरतूदीनुसार काकोली घोष यांना किमान १९ खासदारांचे समर्थन गरजेचे आहे. ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या व्यक्तींनी बंडखोर नेत्यांजवळ दोन तृतिआंश खासदारांचे समर्थन नाहीये असा दावा केला आहे. किर्ती आझाद यांनी पक्षात मोठी फूट अशी अफवा भाजपच्या डर्टी ट्रीक्स डिपार्टमेंटकडून पसरवली जात आहे. यात बंडखोर गटाला २० खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. हे खोटं आहे कारण भूपेंद्र यादव यांच्या घरात झालेल्या बैठकीत फक्त १३ खासदार सामील झाले होते. यातील १२ खासदार हे लोकसभेचे आणि एक राज्यसभेचा खासदार होता. याशिवाय कोणीही यांच्या पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही.