TMC MP Kalyan Banerjee attack: पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष पेटला, तृणमूल खासदारावर जीवघेणा हल्ला

पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंडीतला पोलीस ठाण्यासमोर तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
TMC MP Kalyan Banerjee attack
TMC MP Kalyan Banerjee attackfile photo
Published on
Updated on

TMC MP Kalyan Banerjee attack

कोलकाता : पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंडीतला पोलीस ठाण्यासमोर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अटक करण्यात आलेले पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी टीएमसीकडून निवेदन देण्यासाठी जात असताना हा हल्ला झाला.

डोक्यावर ओला रुमाल ठेवून कल्याण बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आरोप केला आहे की, चंडीतला पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. लोकशाही मार्गाने निषेध नोंदवण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, निवेदन सादर करण्यापूर्वीच टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने वातावरण अधिकच तापले.

भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसी समर्थकांविरोधात 'चोर-चोर' अशा घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली आणि परिसरात तणाव वाढला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच केंद्रीय सुरक्षा दलांनाही सज्ज ठेवण्यात आले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे दिसून येत आहे.

TMC MP Kalyan Banerjee attack
Mamata Banerjee | "त्यांचा जीव गेला असता": पुतण्या अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्याबाबत ममता बॅनर्जी नेमकं काय म्‍हणाल्‍या?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news