TMC Crisis Rebel MP Merge: तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी रविवारी आपला गट नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया अर्थात NCPI मध्ये सामील केला. याबाबतचे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं आहे. हा त्रिपुराचा जास्त कोणारा माहिती नसलेला पक्ष एनडीएचा भाग असल्यामुळं आता एनडीएची दिल्लीतील ताकद वाढली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी रविवारी ओम बिर्ला यांची भेट घेऊन बंडखोर गट हा नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात विलीन करत असल्याचं पत्र दिलं. या पक्षाची स्थापनाच २०२२ मध्ये झाली असून त्यांनी २०२३ मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती.
देशात या पक्षाचा एकही खसदार नाही. आता बंडखोर खासदारांच्या म्हणण्यानुसार ओम बिर्ला हे २० खासदारांच्या स्वक्षऱ्यांची पडताळणी करून या विलीनकरणाला मान्यता देतील. दरम्यान, फोडाफोडीच्या राजकारणाचा चाणक्य समजल्या जाणाऱ्यांनी यावेळी महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नुकतेच आम आदमी पार्टी पक्षफुटीवेळी वापलेली रणनिती बदलून मूळ पक्षावर दावा न करता वेगळ्या टुकार पक्षात स्वतःला विलीन करून घेतलं आहे.
बंडखोर खासदारांची म्होरक्या काकोली घोष दसतीदार यांनी ओम बिर्लांसोबतच्या बैठकीनंतर सांगितलं की, 'आम्ही २० खासदार आपला गट नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडियात विलीन करत आहोत. आम्ही एनडीएमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत.'
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष आणि किर्ती आझाल यांनी टीएमसीचे लोकसभेतील नेते अभिषेक बॅनर्जी यांचे पत्र घेऊन ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. हे दोघेही खासदार ममता बॅनर्जी यांच्या गटाचे खासदार आहेत. त्यांनी टीएमसी मधील ही फूट टेन्थ शेड्युलप्रमाणे वैध मानता येणार नाही. टीएमसी ही एकसंघ पक्ष आहे असा दावा केला आहे.
जर टीएमसीमधील बंडखोरांची ही विलिनीकरणाची विनंती मान्य करण्यात आली तर एनडीएची लोकसभेतील ताकद ही २९४ वरबव ३१४ अशी वाढणार आहे. मात्र असं असलं तरी त्यांना सभागृहात दोन तृतिआंश बहूमत मिळवण्यासाठी अजून ४६ खासदारांची गरज लागणार आहे. तर राज्यसभेत एनडीएचा आकडा ही १५५ पर्यंत पोहचणार आहे. ते दोन तृतिआंश बहूमताच्या अगदी काही सीट्स कमी आहे.
भाजपच्या एका खासदारांनी सांगितलं की NCPI हा पक्ष पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यात निवडणूक लढवतो. तृणमूल खासदारांच्या या पक्षात विलीन होण्याच्या निर्णयामुळं बंडखोरांचे पश्चिम बंगालशी नाळ जोडलेली राहील. तसेच यामुळे इशान्येकडील राज्यांचे प्रतिनिधित्व लोकसभेत वाढणार आहे.
ओम बिर्ला यांच्या रविवारी घेतलेल्या भेटीत बंडखोर १९ खासदारांनी त्यांना एनसीपीआय पक्षात विलीन व्हायचं असल्याची इच्छा दाखवली. या १९ बंडखोर खासदारांमध्ये पहिल्यांदाच खासदार झालेल्या रिचा बॅनर्जी यांचा देखील समावेश आहे. त्यामुळं बंडखोरांचा आकडा हा २० पर्यंत गेला आहे.