Air India Aircraft Damaged Delhi Airport pudhari
राष्ट्रीय

Air India Aircraft Damaged Delhi Airport: दिल्लीत वादळाचा कहर; एअर इंडियाच्या तब्बल ३ विमानांचे झाले नुकसान, नेमकं काय घडलं?

Anirudha Sankpal

Air India Aircraft Damaged Delhi Airport: दिल्लीत काल रात्री झालेल्या मोठ्या वादळामुळं दिल्ली विमानतळावरील एअर इंडियाच्या तीन विमानांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळं दिल्ली विमानतळावारील टर्मिनल २ वर पार्क करण्यात आलेली ही विमानांना इंजिनिअरिंग उपकरणे धडकल्याचे सूत्रांकडून कळते आहे.

दिल्ली एअरपोर्ट ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार हे तीनही विमानांना धावपट्टीवरील उपकरणे धडकली. त्यानंतर त्यांची सेवा त्वरित थांबवण्यात आली आहे. एअर इंडिया इंजिनिअरिंग आणि इंडिगो यांची जमिनीवरील सर्व उपकरणे हलवण्यात आली होती. अचानक वादळ सुरू झाल्यानं टर्मिनल २ मध्ये पार्क केलेल्या एअरक्राफ्टवर ते आदळत होते.

खासगी ऑपरेटर्स यांनी सांगितलं की एअर ट्रॅफिक कंट्रोलरने त्यांना वातावरण बदलत आहे याबाबत कोणतेही वॉर्निंग दिली नाही. दरम्यन, एअर इंडियाने या घटनेबाबत बोलण्यास नकार दिला आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या तीन विमानांसोबत इतर ऑपरेटर्सच्या विमानांचे देखील यात नुकसान झालं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT