Flight Emergency Landing : एअर इंडिया विमानाच्या इंजिनला आग, नवी दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

File Photo
File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी (दि. २१) रात्री एक मोठी दुर्घटना टळली. एअर इंडियाच्या 'AI 2802' या विमानाला इंजिनमध्ये आग लागल्याच्या संशयावरून विमानतळावर तातडीने 'आणीबाणी' घोषित करण्यात आली होती. सुदैवाने, हे विमान रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या धावपट्टी 29R वर सुरक्षितपणे उतरले.

मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणादरम्यान विमानाच्या एका इंजिनमधून धूर निघत असल्याचे किंवा आग लागल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर कोणतीही जोखीम न पत्करता वैमानिकाने तात्काळ दिल्ली विमानतळाच्या नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क साधून आणीबाणीची परवानगी मागितली. विमानतळावर अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या हे विमान धावपट्टीवरून सुरक्षित ठिकाणी बाजूला नेण्यात येत असून, तांत्रिक बिघाडाची सखोल तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे काही काळ विमानतळावरील इतर विमानांच्या उड्डाणांवर किरकोळ परिणाम झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news