Ashadhi  Wari 2024
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत बुधवारी वारीचे आयोजन केले आहे. File Photo
राष्ट्रीय

Ashadhi Wari 2024|आषाढी एकादशीनिमित्त राजधानी दिल्लीत सांकेतिक वारी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीचा उत्साह महाराष्ट्रात सर्वत्र शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारचा उत्साह राजधानी दिल्लीतही आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत बुधवारी ( दि.१७) सांकेतिक वारीचे आयोजन करण्यात आले आहे.

Summary

  • आषाढी एकादशीचा उत्साह राजधानी दिल्लीतही

  • दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (दि.१७) सांकेतिक वारीचे आयोजन

  • नागरिकांनी वारीत सहभागी होण्याचे आवाहन

पंढरपूरच्या वारीचे दर्शन दिल्लीकरांना होणार

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आषाढी वारी असते, त्याचप्रमाणे दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने सांकेतिक वारीचे आयोजन दरवर्षी केले जाते. टाळ - मृदंगाचा गजर करत, फुगड्या घालत विठ्ठल रखुमाईच्या भक्तीचा गजर करत दरवर्षी दिल्लीकर मराठी बांधव या वारीचे आयोजन करत असतात. या वारीच्या निमित्ताने अनेक शतकांचा वैभवशाली इतिहास असलेल्या पंढरपूरच्या वारीचे दर्शन दिल्लीकरांना होते.

१२ किलोमीटर वारीचा मार्ग

दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातील हनुमान मंदिरापासून आर. के. पुरम परिसरातील श्री विठ्ठल मंदिरापर्यंत जवळपास १२ किलोमीटर वारीचा मार्ग असतो. दरवर्षी हजारो दिल्लीकर मराठी नागरिक यामध्ये सहभागी होत असतात. अधिकाधिक नागरिकांनी वारीत सहभागी होण्याचे आवाहन दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

असा असेल वारीचा मार्ग -

हनुमान मंदिर,कॅनॅाट प्लेस - बाबा खडकसिंह मार्ग गोल डाकखाना - डॅा.राम मनोहर लोहिया हॅास्पिटल - ११ मूर्ती, सरदार पटेल मार्ग - कौटिल्य मार्ग - शांतीपथ, मोतीबाग उड्डाणपुल - राव तुलाराम मार्ग - मेजर सोमनाथ पथ - संगम सिनेमा - तमिल संग - विठ्ठल मंदिर, रामकृष्ण पुरम

SCROLL FOR NEXT